युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:10+5:302021-03-31T04:35:10+5:30

राजनी येथील शेतकरी पुत्र दीपक रामप्रसाद अवचार (वय २८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दीपक मागील ५ वर्षांपासून ...

Youth suicide | युवकाची आत्महत्या

युवकाची आत्महत्या

राजनी येथील शेतकरी पुत्र दीपक रामप्रसाद अवचार (वय २८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दीपक मागील ५ वर्षांपासून पुणे येथे एमपीएससीची तयारी करत होता. ११ एप्रिल रोजी बुलडाणा येथे होऊ घातलेल्या एका परीक्षेसाठी तो २९ मार्च रोजी घरी आला होता. दरम्यान, सोमवारी रात्री गावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळाले नसले तरी तो शेतकरी कुटुंबातील असून, त्याच्या वडिलांच्या नावे १५ एकर शेती आहे. त्या शेतीवर खामगाव येथील एचडीएफसी बँकेचे ६ लाख रुपये कर्ज आहे. मागील ४ वर्षांपासून शेतात होणारी नापिकी, बँकेचे वाढते कर्ज आणि शिक्षणाला लागणारा खर्च या कारणामुळे त्याने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सुभाष तुकाराम अवचार यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस काॅन्स्टेबल निवृत्ती सानप व पोलीस हेड काॅन्स्टेबल प्रभाकर सानप करीत आहेत.

Web Title: Youth suicide