गवंडी काम करणार्‍या मजुराच्या मुलीचे यश

By Admin | Updated: June 18, 2014 00:39 IST2014-06-17T23:20:56+5:302014-06-18T00:39:19+5:30

परिस्थिती हलाखीची म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागते.

Youth of a masonry worker | गवंडी काम करणार्‍या मजुराच्या मुलीचे यश

गवंडी काम करणार्‍या मजुराच्या मुलीचे यश

खामगाव : घरी ३-४ एकर शेती, पुरेशा पावसाअभावी त्यातही अपेक्षित उत्पन्न निघत नाही. तेव्हा कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वडील बांधकामावर मजुरी करतात. परिस्थिती हलाखीची म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागते. शहरासारखी प्रत्येक विषयाची शिकवणी नाही. त्यामुळे १0 वी त पास होणंही भरपूर झालं. परंतु समोर शिकुन पुढ जायचं असेल तर शिक्षणाकरीता मेहनत घ्यावी लागेल. हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सायलीने वर्षभर मेहनत केली व १0 वी ला ९२ टक्के मार्कस मिळाले. पुढे सायन्सला जावून सायलीला इंजिनिअर व्हायचं आहे. खामगाव तालुक्यातील कंचनपूर कु.सायली रामेश्‍वर ढोले ही बोथाकाजी येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये १0 वी ला होती. कंचनपूर ते बोथाकाजी हे दररोज २ कि.मी. अंतर सकाळ, संध्याकाळ पायी जावे लागते. अगोदरच जि.प.च्या शाळेतील मुले ही इतर खासगी शाळांच्या तुलनेत ह्यढह्ण मजली जातात. मात्र आता जि.प. च्याशाळेनेही दर्जा सुधारला आहे. ग्रामीण भागात पुरेशी शिकवणीची व्यवस्था नाही. शाळेत शिकवीलेले व घरी केलेला अभ्यास यावरच विद्यार्थ्याचे भवितव्य अवलंबुन आहे. सायली ढोले या विद्यार्थीनीने आपल्या घरची परिस्थिती बघितली. घरी शेती असतानाही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून वडील गवंडी लोकांसोबत बांधकामावर मजुरी करतात. आई ही घरकाम सांभाळून शेतीची कामे पाहते. आपण मोठे व लहान भाऊ असे दोघेच असल्याने आपणावर अपेक्षा असल्याचे सायली म्हणते. वडील मेहनत करून जर शिकवीत असतील तर त्यांच्या घामाचे मोल जाणून विद्यार्थ्यांनीही एका ध्येयाने अभ्यास केला पाहिजे

Web Title: Youth of a masonry worker