मोटारसायकल अपघातात युवक ठार; दोन गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 17:42 IST2019-04-26T17:40:09+5:302019-04-26T17:42:33+5:30

बुलडाणा-चिखली रोडवरील घटना    

Youth killed in a motorcycle accident; Two seriously injured | मोटारसायकल अपघातात युवक ठार; दोन गंभीर जखमी 

मोटारसायकल अपघातात युवक ठार; दोन गंभीर जखमी 

ठळक मुद्दे बुलडाणा शहर अगदी पाच किलमिटर अंतरावर राहिलेले असतना त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातील जखमींना उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आले आहे.

बुलडाणा - मोटारसायकल अपघातात एक युवक ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान बुलडाणा-चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरनजिक घडली. या अपघातील जखमींना उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आले आहे. 

बुलडाणा तालुक्यातील अंत्री तेली येथील अंकुश ब्राह्मणे (२५), सचिन रतन मानकर (१८) व सुंदरखेड येथील कुलदिप दिलीप पैठणे (४०) हे तिघे जण मोटारसायकल (क्रमांक एमएच २८-एके-३०२६) ने अंत्री तेलीवरून बुलडाणा येथे येत होते. दरम्यान, बुलडाणा शहर अगदी पाच किलमिटर अंतरावर राहिलेले असतना त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. बुलडाणा-चिखली रोडवर असलेल्या स्थानिक सहकार विद्या मंदिर नजीक त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका लिंबाच्या झाडाला धडकल्याने तिघांनाही जब्बर मार लागला. अपघात घडताच आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काहींनी जखमी असलेल्या तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतू तोपर्यंत सचिन रतन मानकर याचा मृत्यू झाला. अंकुश ब्राह्मणे व कुलदिप पैठणे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतू त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आले आहे.

 

Web Title: Youth killed in a motorcycle accident; Two seriously injured