परिसरातील दारूबंदीसाठी युवक सरसावले

By Admin | Updated: August 20, 2015 23:55 IST2015-08-20T23:55:24+5:302015-08-20T23:55:24+5:30

टाकळी वतपाळ; तरुणांनी दिले ठाणेदारांना निवेदन.

Youth came to the public for the drinking | परिसरातील दारूबंदीसाठी युवक सरसावले

परिसरातील दारूबंदीसाठी युवक सरसावले

नांदुरा (जि. बुलडाणा): तालुक्यातील टाकळी वतपाळ गावात हातभट्टीची तसेच देशी दारूची खुलेआम अवैध विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे गावात व्यसनाधीनता वाढल्याने अवैध दारूविक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाईची मागणी टाकळी वतपाळ येथील नागरिकांनी सोमवारी निवेदनाद्वारे ठाणेदार साळुंखे यांना दिले.
टाकळी वतपाळ येथे कोणतेही शासनमान्य देशी दारुचे दुकान नाही. मात्र, तरीही अवैधरित्या देशी दारु व हातभट्टीची गावठी दारु मोठय़ा प्रमाणात विकली जाते. त्यामुळे गावातील काहींचे संसार उद्ध्वस्त झाले असून गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ही अवैध दारु विक्री रोखण्यासाठी या गावातील तरुणांनी पुढाकार घेत अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर बाळासाहेब दामोधर, बाजार समिती संचालक प्रज्ञावंत तायडे, सतीश तायडे, दिनेश ब्राह्मणे, प्रमोद तायडे, भीमराव तायडे आदींसह अष्टविस तरुणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Youth came to the public for the drinking