पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी!

By Admin | Updated: May 19, 2014 00:45 IST2014-05-19T00:15:04+5:302014-05-19T00:45:45+5:30

खामगाव तालुक्यातील वझर येथील पाणीपुरवठा योजनेच्या च्या चौकशीची मागणी.

Water supply scheme should be investigated! | पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी!

पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी!

खामगाव : तालुक्यातील वझर येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे भरत ठाकुरसिंग टाकडा रा. वझर यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीत टाकडा यांनी म्हटले आहे की, वझर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम मागिलवर्षापासून सुरु आहे. मात्र आजपर्यंतही पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजनेबाबत वझर ग्रामस्थांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा उपविभाग खामगाव यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. तर ३ मे रोजी उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी यांचेसोबत संगनमत करुन गत ६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा कामाचा हप्ता १0 लाख १0 हजार ७५६ रुपये हा पाणीपुरवठा समितीच्या नावे वळता करावा याचा पंचनामा करुन ग्रामपंचायत पाणीपुरवठा समिती यांना पंचनाम्याची लेखी स्वरुपात माहिती दिली. परंतु विहिर खोदकामाची कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आज रोजी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. झालेले विहीर खोदकाम व स्वीचरुमचे काम निकृष्टदर्जाचे झाले आहे. तरी या कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Water supply scheme should be investigated!