शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणार शहरात आता दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: June 16, 2014 00:50 IST

पाणीपुरवठा योजनेला गती आली असून आता लोणारकरांच्या नळाला २ वेळेस पाणीपुरवठा होणार आहे.

लोणार : ग्रामपंचायतकालीन योजनेवरुन होणार्‍या पाणीपुरवठय़ामुळे गेल्या २0 वर्षापासून लोणार शहर पाणीटंचाईच्या झळा सोसत आले आहे. येथील पाणीपुरवठा योजनेला गती आली असून आता लोणारकरांच्या नळाला २ वेळेस पाणीपुरवठा होणार आहे. १९ जून रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व ऊर्जा मंत्री राजेंद्र मुळक यांच्याहस्ते येथील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. येथील खार्‍या पाण्याच्या सरोवरामुळे जागतिक वारसा लाभलेल्या लोणार शहरातील नागरिकांना २0 वर्षापासून ग्रामपंचायती कालीन योजनेवरुनच पाणीपुरवठा सुरु आहे. शहरातील नागरिकांना यामुळे २0 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लोणार करांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी व शहरवासियांना नियमीत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता सन २00७ मध्ये नगर पालीकेने उपाध्यक्ष राजेश मापारी यांनी महाराष्ट्र शासनाकडून सुजल निर्मल योजनेअंतर्गत बोरखेडी पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटी रुपये मंजुर करुन आणले. मात्र योजनेसाठी लोकवर्गीची अट असल्यामुळे योजनेला तांत्रिक मंजुरात मिळू शकली नाही. त्यानंतर २00९ मध्ये पार पडलेल्या लोणार न.प.च्या निवडणुकीत शहरवासियांनी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात कौल देत नगर पालीका सेनेच्या ताब्यात दिली. गत पाच वर्षात माजी नगराध्यक्ष प्रा.बळीराम मापारी यांनी खा.प्रतापराव जाधव आणि आ.संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून योजनेचा पाठपुरावा करुन योजनेला तांत्रिक मंजुरात मिळवून घेतली. तसेच नळयोजनेच्या सुधारीत कामांसाठी ५0 लक्ष रुपयांचा प्रथम हप्ताही शासनाकडून मंजूर करुन आणला. मात्र पुन्हा मार्च २0१४ मध्ये पार पडलेल्या न.प.च्या निवडणुकीत शहरवासियांनी सत्ताधारी सेनेच्या विरोधात कौल देत १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे निवडून दिले. बहुमताने न.प.वर काँग्रेसचा तिरंगा फडकविला. काँग्रेसनेही नगराध्यक्षपदाची माळ सौ.रंजना राजेश मापारी यांच्या गळ्यात टाकली. ज्या राजेश मापारी यांनी २00७ मध्ये शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी सुजल निर्मल योजना मंजूर करुन आणली त्याच योजनेचे काम त्याच्याच कार्यकाळात पुर्णत्वास जात आहे. हे विशेष! तिर्थक्षेत्र आळंदीच्या पाणीरुवठा योजनेच्या लोकवर्गणीची अट ज्याप्रमाणे शासनाने रद्द केली त्याच धर्तीवर लोणारचीही लोकवर्गणीची अट रद्द झाली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती प्राप्त झाली असून १९ जून रोजी जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपुजन तसेच मुख्य पाण्याच्या टाकीसह गावातील इतर ३ पाण्याच्या टाकीेचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. जलशुदीकरण केंद्रासह विविध कामांच्या भूमिपुजनास राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, उर्जामंत्री राजेंद्र मुळक, आ.दिलीप सानंदा, आ.राहूल बोंद्रे, आ.अमित झनक, जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, केंद्र व राज्य सनियंत्रण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, जि.प.बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे, सौ.मायाताई चव्हाण उपस्थित राहणार आहेत.