वाणाच्या साहित्याने खामगाव बाजारपेठ सजली

By Admin | Updated: January 14, 2015 23:43 IST2015-01-14T23:43:39+5:302015-01-14T23:43:39+5:30

आकर्षक वस्तूंची वाणात भेट देण्याकरिता महिलांची लगबग.

Wamana literature has opened the Khamgaon market | वाणाच्या साहित्याने खामगाव बाजारपेठ सजली

वाणाच्या साहित्याने खामगाव बाजारपेठ सजली

खामगाव : मकरसंक्रांतीचा सण अवघ्या एक दिवसावर येवून ठेपल्यामुळे बाजारपेठेत वाणाच्या विविध वस्तूंची रेलचेल दिसून आली. वाण खरेदीसोबतच वाणात भेट दिल्या जाणार्‍या वस्तू खरेदीसाठी आज बुधवारी बाजारपेठेत महिलांची गर्दी होती.
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची मागणी लक्षात घेऊन व्यापारी व विक्रेत्यांनी विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. वाण, पदार्थ, फळांची बाजारपेठ फुलली आहे. त्याचप्रमाणे मकरसंक्रांतीला आवर्जून घेतल्या जाणार्‍या उखाण्यांची पुस्तकेही बाजारात उपलब्ध झाली आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यावर फरशी भागात गत तीन-चार दिवसांपासून वाणाच्या साहित्याची दुकाने थाटू लागली आहेत.

Web Title: Wamana literature has opened the Khamgaon market