शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करमोडा गावात सौर ऊर्जेसह ग्रामस्थांचा विमा

By admin | Updated: September 2, 2015 02:28 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; सांसद आदर्श ग्राम योजनेवर झाली चर्चा.

बुलडाणा : करमोडा या गावांमध्ये होणार्‍या विकास कामांमुळे गावाचा कायापालट करणार आहोत. या गावांमध्ये सौर उर्जेवर आधारित पथदिवे बसविण्यात येणार असून, पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेंतर्गत गावातील पात्र कुटुंबप्रमुखांचा विमा उतरविण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. सांसद आदर्श ग्राम योजना आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, येथील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेतून शिलाई मशीन दिल्या जाईल. तसेच प्रत्येक कुटुंबाला रेडिमेड शौचालय स्वच्छ भारत अभियानांतर्गत बसवून देऊन त्यासाठी गावात तीन प्रकारच्या शौचालयांचे मॉडेलही गावकर्‍यांच्या निवडीसाठी उपलब्ध करून दिल्या जाईल. ही सर्व कामे दर्जेदार व गावाला आदर्शपण देणारी असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांनी करमोडासारख्या आदिवासीबहुल गावाचा समावेश केला आहे. या गावांना आदर्श बनविण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांच्या एकत्रिकरणातून गावांमध्ये सर्व विभागांच्या समन्वयाने विकास कामे सुरू आहेत. गावाला आदर्शपण देण्यासाठी ही सर्व सुरू असलेली कामे विहीत मुदतीत पूर्ण करावी, असे आदेश सर्व यंत्रणेला दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा नियोजन अधिकारी सेडाम, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.