शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 02:09 IST

नऊ नगरपालिकांमध्ये निवड; बुलडाण्यात काँग्रेसला डावलून भारिपचा स्वीकृत सदस्य.

बुलडाणा, दि. ४- जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड बुधवारी करण्यात आली. पीठासिन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्यांची निवड केली.जिल्ह्यात नऊ नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या २३ जागांसाठी ७६ जणांनी मंगळवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी या सदस्यांची निवड करण्यात आली. बुलडाणा येथे शिवसेनेचे विजय जायभाये यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्यासाठी ऐनवेळेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे संजय गायकवाड, भारिपचे मो. सज्जाद व भाजपचे उदय देशपांडे यांची निवड करण्यात आली. चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी वजीराबी शे.अनिस यांची वर्णी लागली, तर स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे पंडितराव देशमुख, अनुप महाजन व काँग्रेसचे सुनील कासारे यांची निवड करण्यात आली. मेहकर नगरपालिका उपाध्यक्षाची अविरोध निवड झाली. यामध्ये न.पा. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जयचंद बाठिया, तर स्वीकृत सदस्यपदी विकास जोशी व अक्काबाई गायकवाड यांची अविरोध निवड करण्यात आली.खामगाव येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे संजय (मुन्ना) पुरवार स्पष्ट बहुमताने निवडून आले. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी भाजपातर्फे संदीप वर्मा आणि किशोर भोसले, तर काँग्रेसतर्फे सरस्वती खासणे यांची निवड झाली. शेगाव नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाच्या वर्षा धमाळ यांचा १४ विरुद्ध १0 मतांनी विजय झाला, तर स्वीकृतसाठी विजय देशमुख, प्रदीप सांगळे, शिवाजी बुरूंगले यांच्या नावावर संख्या बलानुसार तिघांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.मलकापूरमध्ये उपाध्यक्षपदी हाजी रशिदखाँ जमादार, तर स्वीकृत सदस्य म्हणून भाराकाँचे नारायणदास निहलानी, दिलीप देशमुख व प्रा.डॉ.अनिल खर्चे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.नांदुरा न.प.उपाध्यक्ष पदाच्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी न.प.ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी जवरे यांच्या अध्यक्षतेत न.प. सभागृहात घेण्यात आली. यामध्ये न.प. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे लालाभाऊ इंगळे यांची अविरोध, तर नामनिर्देशन सदस्यांच्या दोन पदांसाठी महेश चांडक व श्रीधर बुरुकले यांची निवड करण्यात आली. जळगाव जामोद नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक मांगीलाल भंसाली हे विजयी झालेत .नगरपालिका            पक्ष                 उपाध्यक्ष बुलडाणा                 शिवसेना           विजय जायभायेमेहकर                   शिवसेना           जयचंद बाठिया चिखली                  भाजप              वजीराबी शे. अनिस देऊळगाव राजा       शिवसेना           पवन झोरे खामगाव               भाजप               संजय पुरवार शेगाव                   भाजप               वर्षा धमाळ नांदुरा                   शिवसेना            लाला इंगळेमलकापूर              काँग्रेस               हाजी रशिदखाँ जमादारजळगाव जामोद      भाजप              मांगीलाल भंसाली