वाढत्या तापमानामुळे भाजीपाला महागला!

By Admin | Updated: April 10, 2017 00:43 IST2017-04-10T00:43:01+5:302017-04-10T00:43:01+5:30

खामगाव : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे.

Vegetable costlier due to rising temperature! | वाढत्या तापमानामुळे भाजीपाला महागला!

वाढत्या तापमानामुळे भाजीपाला महागला!

बाजारात आवक घटल्याने वधारले भाव
खामगाव : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. वांग्यासह इतरही भाज्या किरकोळ बाजारात ४0 ते ५0 रुपये प्रतिकिलोच्यावर पोहोचल्या आहेत.
शहरात भाजी बाजारपेठेत जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते. यामुळे भाजीबाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही. पण, आता ही आवकरच घटल्याने दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती. पण ऊन तापू लागल्यामुळे शहरात भाज्यांची आवक रोडावते आहे.
शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले. केवळ पत्ताकोबी, लवकी आणि कोहळे सध्या तुलनेने स्वस्त आहेत. उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी झाली आहे.पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

कांद्याने दिला गृहिणींना दिलासा
सध्या जिल्ह्यासह व लगतच्या जिल्ह्यातून कांदा बऱ्यापैकी येत आहे. यामुळे सध्या १0 ते १५ रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या कांद्याने दिलासा दिलेला आहे. मात्र भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बटाटा सुद्धा येत्या काळात महागण्याची शक्यता आहे.

सध्या भाजीपाल्याच्या किमतीत चढ-उतार सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजार पेठेत भाजीपाल्याची आवक फारशी नाही. त्यामुळे सध्या काही प्रमाणात भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

- गणेश मेश्राम, भाजी विक्रेता

Web Title: Vegetable costlier due to rising temperature!