शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलपासून वंचितांचे उपोषण सुरू

By admin | Updated: August 20, 2014 22:33 IST

रमाई घरकुल योजनेपासून वंचित लाभार्थ्यांंचा पात्र यादीत समावेश करावा व खर्‍या पात्र लाभार्थ्यांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र लाभार्थ्यांंची नावे वगळावी, या मागणीसाठी

मोताळा : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर रमाई घरकुल योजनेपासून वंचित लाभार्थ्यांंचा पात्र यादीत समावेश करावा व खर्‍या पात्र लाभार्थ्यांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून अपात्र लाभार्थ्यांंची नावे वगळावी, या मागणीसाठी शिरवा येथील मागासवर्गीय वंचित लाभार्थ्यांंनी १४ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे.गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरवा येथील मागासवर्गीय कुटुंबांचा दारिद्रय रेषेखालील यादीत समावेश असून, रमाई घरकूल योजना अतंर्गत पात्र लाभार्थ्यांंवर ग्रामपंचायतकडून लाभार्थी निवडीत पक्षपात झाला आहे. ग्रा.पं.कडून जुलै २0१२ च्या सभेत २८ लाभार्थ्यांंची निवड करण्यात आली होती. या यादीत पात्र लाभार्थ्यांंना वंचित ठेवल्यामुळे पुन्हा २६ जानेवारी २0१३ रोजीच्या सभेत ५३ लाभार्थ्यांंची यादी बनविण्यात आली. मात्र या यादीतही पात्र लाभार्थ्यांंवर अन्याय झाल्यामुळे दोन डिसेंबर २0१३ रोजी पुन्हा १७ लाभार्थ्यांंची पुरवणी यादी पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून यादीचा घोळ सुरू असल्यामुळे पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाने शिरवा येथील पात्र लाभार्थ्यांंच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून,खर्‍या पात्र लाभार्थ्यांंची यादी तयार करावी व मंजुरात देऊन अपात्र लाभार्थ्यांंंची नावे वगळाण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र तरीही संबधीतांनी दुर्लक्ष केले. परिणामी दिलेल्या इशाराप्रमाणो रमेश जगदेवराव वाघ, वसंत नामदेव धुरंधर, गौतम जगदेव वाघ, विनोद जगन्नाथ उमाळे, भगवान संपत धुरंधर आदिंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.