२१ हजार शेतक-यांकडून जैविक खतांचा वापर

By Admin | Updated: January 7, 2017 02:25 IST2017-01-07T02:25:40+5:302017-01-07T02:25:40+5:30

शेतक-यांचा जैविक व सेंद्रीय खतांचा वापराकडे कल वाढला!

Use of organic fertilizers by 21 thousand farmers | २१ हजार शेतक-यांकडून जैविक खतांचा वापर

२१ हजार शेतक-यांकडून जैविक खतांचा वापर

बुलडाणा, दि. ६- दुष्काळामुळे कमी होणारे उत्पादन, रासायनीक खतांमुळे होणारी शेतजमीनीची धूप तसेच वाढणार्‍या किंमतीमुळे शेतकर्‍यांचा जैविक व सेंद्रीय खतांचा वापराकडे कल वाढला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून जिल्ह्यात २१ हजार २५0 शेतकर्‍यांना जैविक खतांचे वाटप करण्यात आले आहे. यातून जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र जैविक शेतीखाली आले आहे.
रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते व जमिनीचीही धूप होवून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा नाश होतो. सुरुवातीला जरी रासायनिक खते वा परून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळू न देता अधिक उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय शेती आज महत्वपूर्ण ठर त आहे.
कृषी विभागामार्फत सार्व.साधारण, अनु.जाती, अनु.जमाती मधील अल्पभुधारक शेतकर्‍यांसाठी पिक गुणवत्ता व उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून तेल पिक बियाणे, कृषी अवजारे, पिक संरक्षण औषध, तणनाशके व जैविक खते वापट केली जाते. या योजनेतून २१ हजार २५0 शेतकरी जैविक खतांचा वापर आपल्या शेतात करीत आहे.

मातीची सुपिकता वाढते
जैविक खातात रायझोबियम, झोटोबॅक्टर, निलहरित शेवाळे, अझोला, फॉस्फोबॅक्टरीयम, मायकोर्‍हायझा इत्यादी सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. यामुळे जमीन-पाणी यांचे प्रदुषण टाळ ता येवून मातीची सुपिकता कायम राहते. हे खत सहन तयार करता येते किंवा उपलब्ध होत असल्यामुळे शेतीमध्ये वापर वाढविला आहे.

विविध स्तरातील शेतकर्‍यांचा सहभाग
या योजनेतून सार्व.साधारण गटातील ४ हजार ६१७, अनु.जाती, गटातील ८४५, अनु.जमातीमधील १६१ आणि महिला १२५0 व इतर अश्या विविध गटातील २१ हजार २५0 शे तकर्‍यांना जैविक खतांचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Use of organic fertilizers by 21 thousand farmers