शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मैदान आखणीसाठी ब्लीचींग पावडरचा वापर

By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST

बुलडाणातालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत येथे पांढर्‍या चुन्या ऐवजी चक्क ब्लीचींग पावडरचा वापर.

कोथळी : बुलडाणा तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्‍याने मैदान आखणीसाठी पांढर्‍या चुन्या ऐवजी चक्क ब्लीचींग पावडरचा गैरवापर केल्याचा प्रकार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजीत ध्व्जारोहणाप्रसंगी ग्रामपंचायत समोर उघडकीस आला.कोथळी गावात गेल्या कित्येक वर्षापासून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी आपापल्या शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांची एकत्रीत प्रभात फेरी निघते. प्रभात फेरी दरम्यान क्रमश: ईब्राहिमपूर ग्रामपंचायत, कोथळी ग्रामपंचायत व मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न होत असतो. कार्यक्रमासाठी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ एकत्र येत असल्याने संबधीत ठिकाणी साफसफाई व सजावटीसह घ्वजारोहण व राष्ट्रगीतासाठी रांगेत मुलांना उभे राहण्यासाठी चुन्याचा वापर करीत मैदान आखल्या जाते. मात्र यावर्षी कोथळी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्‍याने ग्रा.पं. समोर चुन्या ऐवजी ब्लीचींग पावडरचा गैरवापर करीत मैदानाच्या रेघा ओढल्या. ही बाब ध्वाजारोहणाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. या बाबत ग्रामसभेदरम्यान माजी सरपंच पांडुरंग चित्ते यांनी ग्रामविकास अधिकर्‍याला धारेवर धरले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सदर बाब आरोग्य सेवक पी. एन. वैराळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. विशेष बाब म्हणजे दोन दिवस आगोदरच कोथळी ग्रा. पं. ला ब्लीचींग पावडरचा वापर करण्याबाबत पत्र दिले गेले असून, राहूल वाघोदे या युवकाने जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन यांचेकडे ब्लीचींग पावडर बाबत पाठपुरावाही केला होता. मात्र कोथळी ग्रामपंचायत ब्लीचींग पावडरचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी न करता चुना म्हणून करीत आहे. तर दुसरीकडे सहा ते सात दिवसानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी ब्लीचींग पावडर विना पुरवीले जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबधीत अधिकार्‍यावर कारवाई करावी व ब्लीचींग पावडर युक्त पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.