शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बालकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:01 IST

Buldhana Court बुलडाणा न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  पाच वर्षाच्या बालकाशी अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी बुलडाणान्यायालयाने एका आरोपीस  सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.बुलडाणा शहरात ३ मे २०१९ रोजी ही घटना घडली होती. चिमुकला मुलगा हा घरासमोर खेळत असताना आरोपी सिद्धार्थ सपकाळ (२३) याने त्यास चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून त्याच्याशी अनैसर्गिक संभोग केला. दरम्यान चिमुकल्यास त्रास झाल्याने त्याने आरडा अेारड केली असता आरोपीने तेथून पळ काठला. दरम्यान चिमुकल्या मुलाने हा संपुर्ण प्रकार त्याच्या आईला सांगितला. प्रकरणी त्याच्या आईने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी विरोधात विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास केला व बुलडाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेत चिमुकला मुलगा जवळपास ४८ तास डॉक्टरांच्या निगराणी खाली होता. त्यानंतर त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली.  हे प्रकरण बुलडाणा सह जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. प्रकरणात सुनावणीदरम्यान वादी पक्षातर्फे पीडित मुलाची आई, पीडित मुलगा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय शालीकराम निकाळे व डॉ. स्वाती गोलांडे आणि तपासी पोलिस अधिकारी विनायक रामोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण बुलडाणा न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान दंड न भरल्यास एक महिन्याच्या शिक्षेची तरतूद निकालात आहे.या प्रकरणात वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजू मांडली तर त्यांना पोलिस कोर्ट पैरवी पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय