मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:07+5:302021-04-15T04:33:07+5:30

दुसरबीड : भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला़ ही घटना १४ एप्रिल राेजी ...

A two-wheeler collided with a cargo vehicle, killing one | मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार

मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार

Next

दुसरबीड : भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला़ ही घटना १४ एप्रिल राेजी मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रस्त्यावर घडली़ गणेश भाऊराव नागरे (२५) रा़ साेयंदेव असे मृताचे नाव आहे़

सोयंदेव येथील गणेश भाऊराव नागरे हा विद्यार्थी दुचाकी क्र. एमएच २८ एस ७५५९ ने १४ एप्रिल राेजी हिवरा आश्रम येथे जात हाेता़ दरम्यान, मलकापूर पांगरा येथील एक वळणावर समोरून आलेल्या मालवाहू वाहन क्र. एमएच २८ बीबी ३०३७ ने दुचाकीला जबर धडक दिली़ या अपघातात गणेश भाऊराव नागरे याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी बिट जमादार नारायण गीते, पो.काॅ. विशाल बनकर, दिनकर बावरे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली़ यावेळी माजी सरपंच शंकर जायभाये, विलास बोन्द्रे यांनीही मदत केली़ अपघातानंतर मालवाहू वाहनाचा चालक साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला हाेता़ घटनास्थळ बीबी पोलीस स्टेशनमध्ये असल्याने पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पवार करत आहेत.

Web Title: A two-wheeler collided with a cargo vehicle, killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.