जानेफळ येथे एकाच दिवशी दोन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST2021-04-10T04:34:27+5:302021-04-10T04:34:27+5:30

स्थानिक रमानगरमधील रहिवासी असलेल्या गणेश रामा साबळे (वय २० वर्ष) या युवकाने आपल्या राहत्या घरात टिनपत्राच्या छताखाली असलेल्या लाकडी ...

Two suicides on the same day at Janephal | जानेफळ येथे एकाच दिवशी दोन आत्महत्या

जानेफळ येथे एकाच दिवशी दोन आत्महत्या

स्थानिक रमानगरमधील रहिवासी असलेल्या गणेश रामा साबळे (वय २० वर्ष) या युवकाने आपल्या राहत्या घरात टिनपत्राच्या छताखाली असलेल्या लाकडी बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. याबाबत फिर्यादी शंकर शेषराव जाधव (वय १९) यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत सुभाष रतन जाधव (वय ४५ रा. वरवंड ता. मेहकर) यांनी बोथा शिवारात प्रल्हाद बोराडे यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. याबाबत किशोर निंबाजी हिवाळे (रा. वरवंड) यांनी जानेफळ पोलिसांना माहिती कळविल्यानंतर बीट जमादार प्रल्हाद टकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

एकाच दिवशी घडलेल्या या दोन आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two suicides on the same day at Janephal