ट्रक व कंटेनरची धडक

By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:18:39+5:302014-06-07T23:45:39+5:30

ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक होवून २ जण जखमी

Trucks and Container Strikes | ट्रक व कंटेनरची धडक

ट्रक व कंटेनरची धडक

खामगाव : गव्हाचे पोते घेऊन जाणारा ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक होवून २ जण जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्राळा फाट्याजवळ घडली. एम.पी.0९-एफ.जी.७६८६ या क्रमांकाचा ट्रक गव्हाचे पोते घेवून हैद्राबादकडे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील पिंप्राळा फाट्याजवळ दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास समोर चालणार्‍या मोटारगाडीचे अचानक ब्रेक लागल्याने तीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाने समोरुन येणार्‍या कंटेनरला धडक दिली. यामध्ये ट्रकचालक फिरोज मेवाती रईस वय २५ रा.आगर मध्यप्रदेश हा जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या अपघातात कंटनेरचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविल्याची माहिती आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास १ तास वाहतूक खोळंबली होती. ग्रामीण पोलिस स्टेशनचे बिट जमादार मिलींद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून त्वरीत अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहनधारकांना रस्ता सुरळीत करुन दिला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Trucks and Container Strikes