ट्रकचालकाचा खून

By Admin | Updated: June 10, 2015 02:37 IST2015-06-10T02:37:50+5:302015-06-10T02:37:50+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावाजवळील घटना.

Truck owner's blood | ट्रकचालकाचा खून

ट्रकचालकाचा खून

सिंदखेडराजा ( जि. बुलडाणा) : तालुक्यातील पळसखेड चक्का गावाजवळ ट्रकचालकाचा अज्ञात आरोपींनी खून केल्याची घटना ८ जून रोजी घडली. या प्रकरणी ९ जूनला पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ब्रह्मदेव लालमोहन यादव रा. दुसदनिया, बिहार हे पुण्यावरून कोलकाता येथे डब्ल्यू.बी.२३ सी. २५९५ क्रमांकाच्या ट्रकने माल घेऊन जात होते. दरम्यान, पळसखेड चक्का गावानजीक ट्रकचालक ब्रह्मदेव यादव यांचा अज्ञात आरोपींनी खून केला. यासंदर्भात सिंदखेडराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळच्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मसराम, पोहेकाँ मिसाळ हे करीत आहेत.

Web Title: Truck owner's blood