शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची अँपेला धडक; दोन ठार

By admin | Updated: June 14, 2014 23:45 IST

भाविकांच्या अँपेला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

बुलडाणा : नवस पूर्ण करून तालुक्यातील वरवंड येथील नातेवाईकांच्या घरी जात असलेल्या भाविकांच्या अँपेला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ जून रोजी रात्री १0 वाजेदरम्यान घडली. या अपघातात एक इंडिका कारही क्षतिग्रस्त झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उमनगाव येथील खिल्लारे परिवाराचे सदस्य नवस पूर्ण करण्यासाठी एमएच-२८ एबी-१२९९ क्रमांकाच्या मालवाहू अँपेने बुलडाणा तालुक्यातील र्मदडी घाटातील देवीच्या मंदिरात गेले होते. नवस पूर्ण झाल्यानंतर सर्व खिल्लारे परिवार अँपेने बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामासाठी निघाले; दरम्यान बुलडाणा-खामगाव मार्गावरील वरवंड फाट्याजवळील एका थाब्यावर पाणी पिण्यासाठी अँपे थांबविण्यात आला. यावेळी बुलडाणा येथून खामगावकडे १0 चाकाचे एमएमच-0४ टीआरएल-८२६ क्रमांकाच्या (चेचिस) ट्रकने फाट्याजवळ असलेल्या एमएच-२८ व्ही-७६८२ क्रमाकांच्या इंडिगो कारला मागून धडक दिली. या अपघातात इंडिगो कार रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेली.
यावेळी अनियंत्रित झालेला ट्रक सरळ अँपेवर धडकला. यावेळी अँपेतून उतरणारे गौतम परमेश्‍वर खिल्लारे वय ९ व प्रकाश रामराव खिल्लारे वय ५५ यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राहत मसीहा रहेमत मसीहा रा.जमशेदपूर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

** सैलानी जाणार्‍या गाडीचा अपघात; नऊ जण जखमी

मेहकर : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना १३ जून रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मेहकर-चिखली रस्त्यावरील नागझरीच्या उतारात घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, जिंतूर जिल्ह्यातील येलदरी येथे एकत्र लग्नसोहळ्यासाठी काही मंडळी एम.एच.२२ एच.२३५६ क्रमांकाच्या वाहनाने आले होते; मात्र सर्वांनी बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यांच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. हे सर्व जण सैलानीला जात असताना मेहकर-चिखली रस्त्यावर नागझरीच्या उतारात या भाविकांच्या वाहनचालकाने समोरुन जाणार्‍या महेंद्रा पिकअपला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; दरम्यान महेंद्र पिकअपचा जोरदार धक्का भाविकांच्या वाहनाला लागला. त्यामध्ये वाहन चक्क तीन पलट्या घेऊन उताराच्या खड्डय़ात पडले. त्यात रवींद्र शंकर डिंगणे (५0), सुषमा रविंद्र डिंगणे (४२), ज्ञानेश्‍वर रविंद्र डिंगणे (१८), अख्तर युनूस मुलाणी (४0) सर्व रा.श्रीपूर जि.सोलापूर, मिलिंद थोरात, ऐश्‍वर्या गजानन जंत्रे (१८) रा.परळी, सुरेखा शिवाजी बारगजे (३५), राजेश्‍वर शिवाजी बारगजे सर्व रा.नेकनुर जि.बीड आदी जखमी झाले. आ.डॉ.संजय रायमुलकर हे त्याच रस्त्याने मेहकरकडे येत असताना त्यांनी या अपघातातील सर्व जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या जखमींपैकी वाहनचालक मिलिंद थोरात व रवींद्र डिंगणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.