शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची राजरोस तस्करी

By admin | Updated: June 16, 2014 00:51 IST

महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे.

मेहकर : महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे. रेती तस्करांना प्रशासनाचे अभय निर्माण झाल्याने रेती माफीयांना तालुक्यात उधान आले आहे. अवैध रेतीची राजरोस तस्करी केल्या जात असल्याने शासनाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यात पैणगंगा नदीपात्रातून व सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपुर्णा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक केली जात आहे. या नदीमध्ये पाच ते २५ फुट खोल रेतीसाठा आहे. परंतू, महसुल खात्याचे काही अधिकारी मलिदा गोळा करण्यात व्यस्त आहेत. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे पैनगंगा व खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खननाला पेव फुटले आहे. रेती ठेकेदारांवर राजकीय कृपाछत्र असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात रेतीची तस्करी वाढली असून, खुले आम अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. रेती वाहतूक करतांना रेती झाकुन नेल्या जात नसल्याने रेतीचे कण उडुन अपघाताच्या घटनाही घडत आहेत. रात्रीच्यावेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरीता विना नंबर प्लेट वाहनाचा उपयोग रेती माफीया करीत आहेत. रेती वाहतूक करणार्‍या अनेक वाहन चालकांकडे रेती वाहतूकीचा परवाना नसतोच, शिवाय त्यांच्याकडे वाहन चालविण्याचाही परवाना नसतो. तसेच एकाच पावतीवर खाडाखोड करुन अनेकवेळा अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी उपाय योजना करणे गरजेचे असून, परिवहन कार्यालयांनी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. अवैध रेती तस्करी संदर्भात तालुक्यातील महसुल विभागातील कर्मचार्‍यांना पाठबळ देण्याकरीता पोलिस बंदोबस्तात सदर कारवाई होणे गरजेचे आहे. दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरीक्त नदीपात्रात दोन मिटर पेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतांनाही, तसे न होता येथे सर्रास नियमाला मुठमाती दिल्या जात आहे. रेतीची वाहतूक करतांना वाळू झाकून नेणे बंधनकारक असतांना कोणीही हे नियम पाळत नाहीत. तसेच नियमबाह्य अधिक प्रमाणात रात्रीच्या वेळीच रेतीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे. वरिष्ठांनी रेती तस्करींवर लक्ष देऊन यावर अंकुश बसविण्यासाठी विशिष्ट पथकांची निर्मीती करणे गरजेचे आहे.