शेतक-यांसाठी ‘प्रहार’चे टॉवर आंदोलन

By Admin | Updated: July 18, 2015 02:14 IST2015-07-18T02:14:53+5:302015-07-18T02:14:53+5:30

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन.

Tower movement of 'Prahar' for farmers | शेतक-यांसाठी ‘प्रहार’चे टॉवर आंदोलन

शेतक-यांसाठी ‘प्रहार’चे टॉवर आंदोलन

अमडापूर/उंद्री (जि. बुलडाणा): शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकरिता आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उंद्री येथील एअरटेल टॉवर वर चढून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १७ जुलै रोजी शोले स्टाईल आंदोलन केले. शेतकर्‍यांसाठी जिल्हा सहकारी बँक तत्काळ सुरू करावी, शेतकर्‍यांचा ७/१२ कोरा करा, बुलडाणा जिल्हा आपत्ती जिल्हा घोषित करावा, मार्च-एप्रिल २0१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचा कांदा व कांद्याच्या बियाणांची भरपाई तत्काळ देण्यात यावी, जिल्हा सह. बँकेच्या टेस्ट ऑडीटची स्थगिती हटवून त्वरित टेस्ट ऑडीट पूर्ण करावे, शेतकर्‍यांना सौर ऊर्जासाठी अनुदान वाढवून सौर ऊर्जाचे धोरण स्पष्ट करावे, शेतकर्‍यांना ठिबक सिंचन अनुदान ९0 टक्के करण्यात यावे, जिल्हा सह. बँकेची माहिती अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशा विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे संजय राणा यांच्यासह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते. मागीलवर्षी अवकाळी पावसाने व गारपिटीने अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना अनेक शेतकर्‍यांना अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही. अशा शेतकर्‍यांना त्वरित मदत द्यावी, जिल्हा सहकारी बँक सुरू नसल्याने शेतकर्‍यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे, त्यासाठी बँक तत्काळ सुरू करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा व पीककर्जासाठी लागणार्‍या अटी कमी करून शेतकर्‍यांना पीक कर्ज पुनर्गठन कर्जाचे वाटप करण्यात यावे, शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी कोरडा दुष्काळ जाहीर करुन शासकीय अनुदान जाहीर करावे, अशा मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी टॉवरवर आंदोलन सुरू केले होते.

Web Title: Tower movement of 'Prahar' for farmers