शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आज प्रकाशोत्सव

By admin | Updated: October 23, 2014 00:14 IST

बुलडाणा शहरात दिवाळीसाठी खरेदीची धूम, को-या नोटा, चांदीच्या नाण्यांना पसंती.

बुलडाणा : दिवाळी हा मांगल्याचा सण. या उत्सवात लक्ष्मी पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये कोर्‍या नोटा, सोने व चांदींचे सिक्के, चलनातील नाणी ठेवण्याची पूवार्पार पध्दत आहे. त्यानुसार गुरूवार २३ ऑक्टोबर रोजी होणार्‍या लक्ष्मी पूजनासाठी अनेकांनी कोर्‍या नोटांची जुळवाजुळव आज चालविली होतीे. यासोबतच सोने-चांदींच्या लक्ष्मी, गणेशाचे छापील नाणे खरेदीसाठी सराफा बाजारात एकच झुंबड उडाली होतीे.अश्‍विन अमावस्या सदोषकाळ म्हणजे लक्ष्मीपूजन होय. लक्ष्मी ही चंचल आहे, असा समज हिंदू शास्त्राप्रमाणे असून लक्ष्मी पूजनाने ती स्थिर होते, अशी आख्यायिका आहे. अनेक घरांमध्ये श्री सुक्ताचे पठणदेखील केले जाते. या दिवशी लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले, याची आठवण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते. याच दिवशी व्यापार्‍यांचे नवे वर्ष सुरू होते. पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची लक्ष्मी पूजनाला वर्षानुवर्ष परंपरा चालत आली आहे. पहाटे पाटावर रांगोळी काढली जाते. तांदूळ किंवा तबक ठेवतात. पूजेमध्ये सोन्याचे दागिने, सोन्या-चादिंचे नाणे, कोर्‍या नोटा ठेवल्या जातात. तसेच घरातील स्वच्छतेसाठी केरसुणीची हळद कुंकू लावून पूजा केली जाते त्यामुळे केरसुणीचीही विक्री मोठया प्रमाणात सुरू आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे धर्माने अधर्मावर विजय मिळविण्याचा दिवस. हा दिवस मंगलमय दीपाने उजळावयाचा आहे, अशी आपली पारंपारीक ङ्म्रद्घा आहे. पूजेकरिता कोर्‍या नोटा मिळविण्यासाठी बँकेत एकच गर्दी झाली होती. चांदीची लक्ष्मी, मूर्ती, सिक्के, समई, गणेश मूर्ती आदिंची खरेदी जोरात सुरू असल्याची माहिती सराफा व्यवसायीकांनी दिली.