टिप्परने कट मारला, जाब विचारल्याने हत्येची धमकी; खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील घटना

By अनिल गवई | Published: April 18, 2024 05:45 PM2024-04-18T17:45:39+5:302024-04-18T17:46:40+5:30

ही घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता दरम्यान घडली

Tipper cuts, threatens to kill for asking for a jab Incident on main road in Khamgaon town | टिप्परने कट मारला, जाब विचारल्याने हत्येची धमकी; खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील घटना

टिप्परने कट मारला, जाब विचारल्याने हत्येची धमकी; खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील घटना

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: भरधाव टिप्परने कारला कट मारल्यानंतर टिप्परचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पाठलाग करून त्याला अडविले. त्यावेळी टिप्परचालकाने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता दरम्यान घडली.

तक्रारीनुसार, स्थानिक गोरक्षण रोड, दाळफैल येथील राहुल पुंजाजी कळमकार (३५) हे मुख्य रस्त्याने कार घेऊन घरी जात हाेते. दरम्यान, जगदंबा चौक ते चौधरी फॅशन कापड दुकानासमोरून जात असलेल्या टिप्परचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवीत कारला कट मारण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून वाहन अडविले असता, त्याने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनाक्रमांकाचा टिप्पर चालवीत असलेल्या चालक फुजल खान याच्याविरोधात भादंवि २७९, ३३६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास स.फौ. मोहन करुटले करीत आहेत.

Web Title: Tipper cuts, threatens to kill for asking for a jab Incident on main road in Khamgaon town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.