आंतरजिल्हा सहमती बदलीसाठी तीन वर्षांंची अट

By Admin | Updated: June 9, 2015 00:09 IST2015-06-09T00:09:34+5:302015-06-09T00:09:34+5:30

निकष शिथिल; पाच वर्षाची अट रद्द.

Three years of condition for transfer of inter-district consent | आंतरजिल्हा सहमती बदलीसाठी तीन वर्षांंची अट

आंतरजिल्हा सहमती बदलीसाठी तीन वर्षांंची अट

बुलडाणा : ग्राम विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी असलेले निकष शिथिल करण्यात आले असून आता पाच वर्षाऐवजी तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी तसेच आपसी बदलीसाठी किमान पाच वर्षे त्या ठिकाणी सेवा देण्याची अट होती. यासंदर्भात ग्राम विकास विभागाने सुधारित अध्यादेश काढून २0 मे रोजी या निकषांमध्ये फेरबदल केले आहे. कर्मचार्‍याची कुठलीही बदली प्रक्रिया ही आता क्लिष्ट झाली आहे. विशेष करून शिक्षकांच्या बदल्यांबाबत अधिक गुंतागुंत आहे. प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त शिक्षक होतात. अशा स्थितीत आपसी बदलीने जिल्ह्याबाहेरुन आलेल्या शिक्षकाला सेवेत सामावून घेणे अडचणीचे ठरते. इतर कर्मचार्‍यांनाही कमी अधिक प्रमाणात अशा अडचणींचा सामना करावा लागतो. सुदैवाने आपसी बदलीचा निकष बदलल्याने आता आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Three years of condition for transfer of inter-district consent