शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार पाटील निलंबित

By admin | Updated: March 27, 2015 01:38 IST

फुंडकर यांच्या लक्षवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश.

खामगाव (जि. बुलडाणा) : बेवारस सायकली, गुन्ह्यातील मोटारसायकली व साहित्य विकताना शासन नियमांचे उल्लंघन करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शहर पो.स्टे.चे तत्कालीन ठाणेदार दिलीप पाटील यांना २६ मार्च रोजी तडकाफडकी आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या लक्षवेधी मागणीवर गृहराज्य मंत्री ना. राम शिंदे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. खामगाव शहर पो.स्टे.चे नुकतेच बदलून गेलेले ठाणेदार दिलीप पाटील यांनी २७ मे २0१४ रोजी ६५ बेवारस सायकलींसह काही मोटारसायकली व गुन्ह्यातील साहित्यांची लिलावाद्वारे विक्री केली होती. २0 वर्षांपासून बेवारस असलेल्या सायकली विकण्यासाठी ठाणेदार पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना २८ एप्रिल २0१४ रोजी विनंती केली होती. त्यानुसार २९ एप्रिल २0१४ रोजी लिलावाबाबतचा जाहीरनामा काढून १ महिन्याची मुदत देऊन जाहीरनाम्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्याचे पत्र ठाणेदारांना देण्यात आले होते. त्यानंतर ठाणेदार पाटील यांनी ३0 एप्रिल २0१४ रोजी जाहीरनामा काढल्याचा अहवाल व मूल्यांकन केल्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांना दिला. २१ मे २0१४ रोजी ६५ सायकली लिलावाद्वारे विकण्याची परवानगी उपविभागीय अधिकार्‍यांनी दिल्यानंतर २७ मे २0१४ रोजी वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात मर्जीतल्या एकालाच ठाणेदारांनी सायकली व साहित्य विकले. यातून दाखविलेली रक्कम सुमारे दोन महिने वापरली व नंतर खात्यात जमा केली. तसेच २७ मे २0१४ रोजी लिलावात विक्री झालेली एक मोटारसायकल पुन्हा लिलावाच्या २0 डिसेंबर २0१४ च्या जाहीरनाम्याच्या जाहिरातीत नमूद करण्यात आली, असे मुद्दे उपस्थित करून या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचे आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करून ठाणेदार पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे केली. आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रक्रियेची संपूर्ण माहिती सभागृहात मांडली.