युवकांनो समाजोन्न तीसाठी पुढाकार घ्या

By Admin | Updated: May 31, 2014 23:55 IST2014-05-31T23:44:27+5:302014-05-31T23:55:05+5:30

चिखली येथे सत्यपाल महाराजांचे आवाहन; महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य.

Take initiative for youths to socialize | युवकांनो समाजोन्न तीसाठी पुढाकार घ्या

युवकांनो समाजोन्न तीसाठी पुढाकार घ्या

चिखली : भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचे नाव अजरामर आहे. महापुरूषांचे विचार अंगीकारणे म्हणजेच त्यांची भक्ती करणे होय. मात्र समाजामध्ये आजही असलेली पराकोटीची अंधङ्म्रध्दा व व्यसनाधिनतेमुळे पार सत्यानाश झाला असून युवा वर्गाने हे चित्र बदलण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सप्तखंजेरी सम्राट सत्यपाल महाराजांनी केले. तालुक्यातील अंचरवाडी येथे २८ ते ३१ मे दरम्यान आयोजित महाराणा प्रताप जयंती महोत्सवाअंतर्गत २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सिध्दीविनायक संस्थानमध्ये सत्यपाल महाराजांचे समाज प्रबोधनपर राष्ट्रीय किर्तन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव होते तर प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन उद्योग समुहाचे संचालक संजय चेके पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीष गुप्ता, डॉ.प्रतापसिंग राजपूत, तालुका संघचालक एन.डी.राजपूत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Take initiative for youths to socialize