शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांंचा ठिय्या

By admin | Updated: July 24, 2015 00:53 IST

संस्थाचालकाने विद्यार्थ्यांंना हाकलले; निमागव गुरू येथील भास्करराव शिंगणे शाळेतील प्रकार.

बुलडाणा : निमगाव गुरू येथील स्व. भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या राघोजी शिंगणे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांंना शाळेतून हाकलून दिले. तुमचे शाळा सोडण्याचे दाखले घेऊन जा, ही शाळा बंद करायची असे सांगून वर्गात बसण्यास मनाई केली. त्यामुळे गुरुवारी पालकासह सुमारे १४ विद्यार्थ्यांंनी बुलडाणा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. देऊळगावराजा तालुक्यातील निमगाव गुरू येथे स्व. भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय मागील दहा वर्षांं पासून कार्यरत आहे. येथे ८ ते १0 वर्ग असून, यावर्षी दहावीत गेलेल्या १४ विद्यार्थ्यांंना संस्थेच्या सचिव तथा मुख्यध्यापिका विद्या राघोजी शिंगणे यांनी २२ जुलै रोजी वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांंना वर्गातून बाहेर काढले. सर्व विद्यार्थ्यांंनी आपआपले शाळा सोडण्याचे दाखले घेऊन जा, आम्हाला शाळा चालवायची नाही, तुमचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगून वर्ग खाली केला. या संदर्भात पालकांनी विचारले असता संस्थेच्या सचिव विद्या शिंगणे या काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक व दहावीच्या १४ विद्यार्थ्यांंनी गुरुवारी बुलडाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. सदर शाळेत विद्यार्थ्यांंना प्रवेश नाकारल्यास या विद्या र्थ्यांंनी शिक्षणासाठी कोठे जावे, असा सवाल त्यांच्या पालकांनी उपस्थित केला. कारण निमगाव गुरू गावापासून विद्यार्थ्यांंना कोणतीच शाळा जवळ नाही. निमगावपासून देऊळगावमही १३ कि.मी. अंतरावर आहे. तर मध्ये खडकपूर्णा नदी लागते. साठेगाव ७ कि.मी. अंतरावर आहे. या गावाला जाण्यासाठीसुद्धा दोन नद्या लागतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणासाठी या दोन्ही गावाला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे पालकांनी न्याय मागण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले होते.