शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 14, 2014 23:42 IST

संध्याकाळी सुमारे दीड तास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टीनपत्रे उडून घराची पडझड झाली तसेच विजेचे खांब सुध्दा तुटले.

सोनाळा : गावासह परिसरात ११ जून रोजी संध्याकाळी सुमारे दीड तास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टीनपत्रे उडून घराची पडझड झाली तसेच विजेचे खांब सुध्दा तुटले.

त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. खंडित विद्युतपुरवठय़ाचे काम संथगतीने सुरु असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याने सहाही प्रभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गावातील जलसाठय़ात पाण्याचा थेंबही नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता हिवरखेड व बावनबीर रस्त्यावरील शेगावला जाणार्‍या पाईपलाईन वरील वॉलवर जावे लागत आहे. बागायती कपाशीला विद्युत मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ११ रोजी सायंकाळी वादळाने गावात थैमान घातल्याने सोनाजी नगर, देशमुख प्लॉट, पंचशील नगर, झाडीपुरा, डोंगरपुरा, पिंगळीवेस, सायखेड वेस, भीमनगर, प्रकाशबाबा चौक, तुकाराम चौक, लंबोधर नगर, वाल्मीक, अन्नाभाऊ साठे नगर आदी भागातील ग्रामस्थांचे घरावरील टीनपत्रे उडाली तर असंख्य घराची पडझड होवून विद्युत पोलही मोडकळीस पडली. नागरिकांना सतत तीन दिवस जागून रात्र काढावी लागली. विद्युत पुरवठय़ाचा फटका तिसर्‍या दिवशीही नागरिकांना बसला. गावाच्या पाणीपुरवठय़ाच्या टाकीत ठणठणाट असल्याने ग्रामस्थांना हातपंपाचा सहारा घ्यावा लागत आहेत. गावातील सर्वच हातपंपावर महिला, पुरुष, आबालवृध्द, मुले यांची भाऊ गर्दी होत आहे. तर असंख्य ग्रामस्थ हिवरखेड व बावनबीर रस्त्यावरील वारी येथून शेगावला जाणार्‍या पाईपलाईन वरील वॉलवर पाण्याकरिता सायकल, मोटारगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी वाहन आदींचा उपयोग करुन पाणी आणत असल्याचे चित्र आहे. गावात विद्युत नसल्याने ग्रामस्थ गावाजवळील टुनकी, बावनबीर, सगोडा गावातील पिटगिरणीवरुन दळण दळून आणत आहेत. जनावराची स्थिती भयानव झाली आहे. ११ रोजी गावात वादळाने थैमान घातले त्यामध्ये गावातील चार रोहीत्र बंद पडली. त्यामध्ये जयस्वाल डी.पी., सायखेड वेस डी.पी. यांना डी.पी. मटन मार्केट डीपी .आदींचा समावेश आहे. या तिन्ही डि.पी.चे काम तिसर्‍या दिवशी संतगतीने सुरु होते. तिसर्‍या दिवशीही गावात दुपारपर्यंत विद्युतपुरवठा बंद होता. वरवट बकाल येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा विद्युतपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने वीज वितरण कंपनीने टुनकी येथील ३३ के.व्ही.मधून सोनाळा ३३ केव्हीला विद्युतपुरवठा जोडण्याचे काम युध्द पातळीवर संथगतीने सुरु होते. यामध्ये दोन दिवस केवळ १0 कामगार हे काम पार पाडत आहेत. शेतातील विद्युतपुरवठा ही खंडित असल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात बागायती कपाशी पेरलेली आहे. बागायती कपाशीला याचा फटका बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोनाळा गावातील व शेतातील विद्युतपुरवठा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतीच्या मशागतीच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

** सोनाळा तलाठय़ांची बदलीची मागणी

तीन महिन्या अगोदर गाव परिसरात गारपिटीने थैमान घातले होते. मात्र तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी कार्यालयात बसून सर्वे केला होता. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असतानाही सरसकट शासनाला ५0 टक्केच्या आत नुकसान दाखवून शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवले होते. ११ रोजी गावात भूमिहिन, गरीब नागरिकांचे टीनपत्रे उडून गेली. घरांची पडझड झाली. तलाठी खेडकर यांनी एकाच दिवसात संपूर्ण गावाचा सर्वे चार वाजेपर्यंत आटोपता घेतल्याने गावातील गरीब, भूमिहिन, शेतमजुराचे नाव सर्वेत असणार का या भावड्या आशेत आपतग्रस्थ पडले आहेत. तलाठी खेडकर व चव्हाण यांची बदलीची मागणी जोर धरीत आहे.