भाडेवाढीविरोधात रेल्वे रोको

By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:43:51+5:302014-06-26T02:05:08+5:30

मलकापूर व नांदुरा येथे आंदोलन : निषेध व्यक्त करून भाडेवाढ मागे घेण्यासाठी निवेदन.

Stop the train against the hike | भाडेवाढीविरोधात रेल्वे रोको

भाडेवाढीविरोधात रेल्वे रोको

नांदुरा : केंद्र सरकारने केलेली रेल्वे भाडेवाढ अन्यायकारक असून सर्वसामान्यांसह सर्वांचीच कंबरडे मोडणारी आहे. सदर भाडेवाढ रद्द करा या मागणीसाठी आज काँग्रेसच्यावतीने येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे व जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदुरा रेल्वे स्थानकावर आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस रोकून धरत केंद्र सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी माजी जि.प.सदस्य नितीन देशमुख, जि.प.सदस्यपती बाबूसिंग डाबेराव यांच्यासह मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नांदुरा ठाणेदार साळुंके आपल्या कर्मचार्‍यांसह उपस्थित होते, तर शेगाव येथून रेल्वे पोलिसांचा मोठा ताफा हजर झाला होता. काही मिनिटे रेल्वे थांबविल्यानंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला.
त्याच प्रमाणे मलकापूर येथे रेल रोकोचा प्रयत्न केला. स्टेशनच्या प्रवेशव्दारीच कार्यकर्त्यांना अटकाव करण्यात आल्याने स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करीत भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Stop the train against the hike