शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नामांकन पत्र दाखल करण्यास आज प्रारंभ

By admin | Updated: September 19, 2014 23:17 IST

पितृपक्ष ठरणार अडसर : बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना घटस्थापनेच्या मुहूर्ताची प्रतीक्षा.

बुलडाणा : येत्या १५ आक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास उद्या २0 सप्टेबर पासून सुरूवात होत आहे. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने उमेद्वारांना नामांकन अर्ज दाखल करण्यास पितृपक्षाची अडसर आहे. त्यामुळे उमेद्वारांना घटस्थापनेची प्रतिक्षा आहे. घटस्थापनेला अद्याप पाच दिवस बाकी असल्याने या पाच दिवसात नामांकन दाखल होण्याची शक्यता फार कमी आहे. ऐन दिवाळीच्या धामधूमीत विधानसभेची निवडणूक लागल्याने ही दिवाळी कोणासाठी गोड तर कोणासाठी कडू होणार आहे. त्यातच उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची तारीख ऐन पितृपक्षात आली आहे. हिंदू धर्माच्या परंपरेत पितृपक्षात एखादे चांगले कार्य हाती घेण्यास अशुभ मानल्या जाते. त्यामुळे या पंधरवाड्यात शक्यतोवर कोणीही उद्घाटन, भुमिपूजन, गृहप्रवेश अथवा एखाद्या शुभ कार्याची सुरूवात करीत नाही. निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणताना तर प्रत्येकजण मुहुर्त पाहुनच अर्ज दाखल करतात. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २0 सप्टेबरला अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. तर २७ सप्टेबर ही शेवटची तारीख आहे.दरम्यान २४ सप्टेबर पर्यंत पितृपक्ष असल्याने येत्या पाच दिवस तरी म्हणजे २४ सप्टेबर पर्यंत कोणीही अर्ज दाखल करणार नाही. पितृपक्ष संपताच २५ सप्टेबरला लगेच घटनस्थापना आहे. २५ सप्टेबरला गुरूवारही येतो. गुरूवार हा दिवस शुभ मानल्या जातो.त्यामुळे पितृपक्ष संपला की दुसरे दिवशी म्हणजे घटस्थापनेला शुभ मुहुर्त माणून गुरूवार पासून अर्ज दाखल करणार्‍या उमेद्वारांचा पोळा फुटणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस उरतात. या दोन दिवसात निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे उमेद्वारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी होणार आहे. **निवडणूक यंत्रणा सज्जउद्यापासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदार संघात तहसिल कार्यालयात निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. बुलडाणा येथे उपविभागीय अधिकारी खांदे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांना सहाय्यक म्हणुन बुलडाण्याचे तहसिलदार संदिप बाजड आणि मोताळ्याचे तहसिलदार हे सहाय्य करणार आहेत.निवडणूक काळात सर्व निवडणूक विभागात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.