शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाविना मृगनक्षत्रास प्रारंभ

By admin | Updated: June 15, 2014 00:44 IST

शेतकर्‍यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्‍यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही.

मोताळा : मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येला किंवा सुरूवातीला हमखास पडणार्‍या पावसाने यावर्षीही पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्‍यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही. रोहिणी नक्षत्रानतंर मृगनक्षत्राचे सहा दिवस उलटले तरी पावासाने हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून आकाशाकडे डोळे लावले आहे. तालुक्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबुन असून वर्ष भराच्या नियोजनाबरोबरच सतत अडथळे येत असले तरी तालुक्यातील शेतकरी त्यावर मात करीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणाला कोणताही उपाय जरी नसला तरी मागील काही वर्षापर्यंत परिसरातील शेतकरीवर्गाने हतबल न होता शेतीचे नियोजन करून आपली फरफट थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पावसाच्या दगाबाजीमुळे शेतीचे नियोजन संपूर्ण कोलमडत आहे. या वर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गाने धुळ पेरणीची जोखीम पत्करली नसून ज्यांच्याकडे सिचंणाची सुविद्या आहे अश्याच शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केली. मृगनक्षत्रात आतापर्यंत वेळेवर पावासाचे आगमन झाल्यामुळे धुळ पेरणी साधल्याही गेली, मृगनक्षत्रला सुरूवात होवून सहा दिवस झाले तरी तालुक्यात पावासाचा थेंब पडलेला नाही. उलट कडक उन्हाळा जाणवत आहे. या वर्षी सुरूवात कोरडी झाल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत असून मृगनक्षत्राच्या या कोरडेपणामुळे शेतीकामास उशीर होत आहे. मृगाचा पहिला पाऊस पडल्यानतंरची महत्वपूर्ण कामे पाण्याअभावी कामे थांबली आहेत. तालुक्यात खरीप पेरणीचे क्षेत्र ५0 हजार २00 हेक्टर असून खरीपात सर्वाधिक लागवड कापसाची केली जाते. काळानुरूप अर्थिक संकटावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी पिक लागवडीत मोठे बदल केले आहेत. या वर्षी सर्वाधिक लागवड सोयाबीनची केली जात आहे. कापूस एक व सोयाबीन दोन क्रमांकावर आहे. पावसाचा लहरीपणा व बाजारात नगदी पिकाला मिळणार्‍या भावामुळे शेतकर्‍यांचा कल यावर्षीही सोयाबीन व कापसाकडेच जात आहे.

** शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत उष्णतेची तमा न बाळगता पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकर्‍यांनी केली असून मृगाकडे शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत. मृगनक्षत्रावरच शेतक र्‍यांची भिस्त असते. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात समाधानकारक पाऊस झाला तर पेरण्या साधतात. यावर्षी देखील असे होईल म्हणून मृगाच्या आशेवर शेतकर्‍यांनी शेतीची कामे आटोपून खत, बियाणे खरेदी करून ठेवले आहे. यावर्षीच्या मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे पाऊस जास्त पडेल अशी धारणा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांचा लपंडाव दिसत आहे. त्यामुळे मृगाचा पाऊस लांबल्याची भावना शेतकरीवर्गात निर्माण झाली असून प्रत्येक जण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.