शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

एसटी झाली ६६ वर्षाची

By admin | Updated: May 28, 2014 23:38 IST

एसटी बस १ जून रोजी ६६ वर्षांची होत आहे.

वाशिम : गावखेड्यात वाडी वस्त्यावर, धावणारी, शाळकरी मुलांना सवलतीच्या दरात निश्‍चितस्थळी पोहोचविणारी, अंध-अपंग, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देणारी, कधी लग्नप्रसंगी दिमाखाने दारात उभी राहणारी सर्वांची लाडकी एसटी बस १ जून रोजी ६६ वर्षांची होत आहे. या एसटीचा वर्धापन दिन हा ह्यपरिवहन दिनह्ण म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्या निमित्ताने राज्यभर एसटी महामंडळात विविध कार्यक्रम सादर करून एसटीच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्यातील सर्व बसस्थानकांवर सजावट करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळाची स्थापना झाली तेव्हा पहिली फेरी १ जून १९४८ रोजी धावली. त्या घटनेला ६६ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. एसटी महामंडळाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे. प्रत्येक बसस्थानकावर रोशनाई करून प्रवेशद्वारावर रांगोळी काढून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची योजन महामंडळाने आखली आहे. तर वेगवेगळ्या कार्यक्रमातून एसटीच्या ६६ वर्षांच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यात महामंडळाने समाजातील विविध घटकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाची सेवा सुरक्षित आहे. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीच्या अपघातांचे प्रमाण जेमतेम १ टक्का आहे. यामुळेच सुरक्षित प्रवासासाठी आजही प्रवासी एसटी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती प्रवाशांना देण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.