एसटी बस-ट्रकचा अपघात; चालक जखमी

By Admin | Updated: August 26, 2015 23:51 IST2015-08-26T23:51:32+5:302015-08-26T23:51:32+5:30

एसटी बसचालक जखमी; जालना येथे रुग्णालयात दाखल.

ST bus-truck accident; Driver injured | एसटी बस-ट्रकचा अपघात; चालक जखमी

एसटी बस-ट्रकचा अपघात; चालक जखमी

मेहकर (जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्कानजीक राज्य महामार्गावर एसटी बस व ट्रकचा समोरासमोर अ पघात झाला. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एसटी बसचालक जखमी झाला असून, त्यास जालना येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिसोड आगाराची एम.एच.४0 वाय ५१८५ क्रमांकाची एसटी बस २६ ऑगस्ट रोजी रिसोडहून सुलतानपूर मार्गे औरंगाबादकडे निघाली होती. एमएच २१ वाय.६५५५ क्रमांकाचा ट्रक सिंदखेडराजाहून सुलतानपूरकडे येत होता. सायंकाळी ६.३0 वाजताचे सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्कानजीक राज्य महामार्गावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एसटी बसचालक जी.आर. मोरे हे मार लागल्याने जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघातात एसटी बसचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापि, प्रवाशांना काहीही झाले नाही. अपघाताची माहिती कळताच किनगावराजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: ST bus-truck accident; Driver injured