शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संत कबिरांसाठी सर्वधर्मियांचा गोतावळा

By admin | Updated: September 2, 2015 02:25 IST

एकात्मतेचे दर्शन करून देणारी भंडा-यांची परंपरा जपतात अंत्री देशमुखवासी.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर : तालुक्यातील अंत्री देशमुख येथे पवित्र श्रावण महिन्याच्या तिसर्‍या सोमवारला संत कबिरस्वामींचा भंडारा करण्याची परंपरा पिढय़ान-पिढय़ापासून चालू आहे. श्रावण सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी अंत्री देशमुख येथे संत कबिरस्वामींचा भंडारा पार पडला. या भंडार्‍यासाठी पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचा गोतावळा जमला होता. संत कबिरस्वामींची महती आजही त्यांच्या दोह्यातून जिवंत ठेवण्याचे कार्य अंत्री देशमुखवासी करीत असून, सर्व धर्मियांमिळून साजरा केला जाणारा हा उत्सव एकात्मतेचे दर्शन घडवितो. हद चलै सो मानवा, बेहद चलै सौ साध। हद बेहद दोऊ तजै, ताकर मधा अगाध । जो चाकोरीत राहून जगतो तो सामान्य माणूस होय. जो रूढी, बंधने झुगारून चाकोरीबाहेरचे जिणे जगतो तो साधू होय; पण जो चाकोरीतील आणि चाकोरीबाहेरील दोन्ही प्रकारचे जीवन सोडून देतो त्याचेच मन खर्‍या अर्थाने अगाध असते, व्यापक असते. या सारख्या अनेक दोह्यांमधून अनिष्ट रूढी, परंपरांवर कठोर प्रहार करून जनतेचे मत परिवर्तन करणारे संत कबिर पंधराव्या शतकात होऊन गेले. संत कबिराची नाळ महाराष्ट्रातील संतांशी जुळत गेली. भारतासह महाराष्ट्रात संत कबिर मंदिर बोटावर मोजण्याइतकी असून, मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख या खेड्यात शेकडो वर्षांपूर्वीचे संत कबिर मंदिर आहे. दरवर्षी गावातील सर्व धर्मियांमिळून वर्गणी जमा करतात. या वर्गणीतून श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या भंडार्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद केवळ पुरूष मंडळीच तयार करतात. यात पुरी, गव्हाच्या भरड्याचा शिरा, कढी, भात हे पदार्थ असतात. सर्वधर्मियांचे लोक करतात संत कबिरांचे पूजनमेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथे सर्वधर्मियांचे लोक केवळ भंडार्‍यातच एकत्र येत नाहीत; तर प्रत्येक सण-उत्सवाच्या दरम्यान सर्वधर्मियांचे व्यक्ती संत कबिरांचे पूजन करतात; तसेच भंडार्‍यात संत कबिरांचे दर्शन घेऊन त्यांचे दोहे गायले जातात. यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंंत सर्वच जण भंडार्‍याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटतात.