शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणाने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST

विद्यार्थ्यांनो हे करा १ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे. २ पेपर सोडवताना ...

विद्यार्थ्यांनो हे करा

१ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे.

२ पेपर सोडवताना किंवा लिखाण करताना उंची नुसार योग्य टेबल खुर्चीचा वापर करणे.

३ दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करणे, परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे

आधी लिहिणे.

लिखाणाची वेळ वाढली!

नियमित शाळा सुरू असताना वर्गात शिकवताना शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले तितक्‍याच गतीने वहीवर लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली होती. गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्गात शिक्षक शिकवत होते आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीने अभ्यास पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग अगदीच मंदावला. वर्षभरात

याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात हाताचं दुखणं वाढत आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका सोडविण्याचा सराव हा पूर्ण बंद झाला आहे. सराव उत्तरपत्रिका सोडवणे बंद झाल्याने सलग तीन तास बसून पेपर सोडवण्याची जी क्षमता व एकाग्रता लागते ती अतिशय कमी झाली आहे. दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर न झाल्यामुळे सलग तीन तासात ही मुले आता कसे पेपर सोडवतील हा एक प्रश्नच आहे, कारण सलग तीन तास पेपर सोडवण्यासाठी बसण्याची क्षमता मुलांमध्ये कमी होत चालली आहे. आता पालकांनीच आपल्या पाल्याचा पेपर सोडविण्याचा सराव व हस्ताक्षर सुधारण्यासाठी लक्ष द्यावे, म्हणजे मुले आत्मविश्वासाने येऊ घातलेल्या परीक्षांना सामोरे जातील.

नरेंद्र लांजेवार, पालक-बालक समुपदेशक बुलडाणा.

मोबाइलमधून दिलेले प्रश्न सोडविण्याकरिता विद्यार्थ्यांना वारंवार थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनाची गती कमी झाली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे विद्यार्थी पटापट वहीत लिहून घ्यायचे. मात्र आता त्यांच्या लेखनाची सवय तुटली आहे. त्यामुळे त्यांचा तणाव वाढला आहे. यावर उपाययोजना म्हणून शुद्धलेखनाचा सराव आवश्यक आहे.

- किशोर वाघ, शिक्षक