शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार!

By admin | Updated: May 1, 2017 23:49 IST

बुलडाणा- २०१७-१८ या वर्षात तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार असून, यातून ५० हजार ८२३ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे.

५० हजार नमुने तपासणीचा लक्ष्यांकनीलेश शहाकार - बुलडाणाशेत जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्यांकडील शेतातील मातीचे परीक्षण करुन, त्याद्वारे जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरु आहे. २०१७-१८ या वर्षात तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार असून, यातून ५० हजार ८२३ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे.रासायनिक खतासह अन्य बाबींच्या अतिवापरामुळे खालावलेल्या जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र शासन यंदापासून ‘मृद आरोग्य पत्रिका" अभियान राबवित आहे. पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ५०० गावांना सहभागी करुन घेत, ३० हजार ८९४ मातीचे नमुने तपासण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ९३९ गावांमध्ये ६० हजार माती नमुना परीक्षण जिल्ह्यातील तीन प्रयोगशाळेतून करण्यात आले. या अभियानातून बुलडाणा जिल्ह्यामध्ये ७ लाख ४८ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रातून माती नमुने तपासले जाणार असून, जवळपास ५ लाख ४८ हजार ६६६ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका दिली जाणार आहे.जैविक खतांचा वापर वाढविण्याचा उद्देशरासायनिक खताचा वापर कमी करून मृद तपासणीच्या आधारावर अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित मात्रा मिळावी. जैविक खते, सेंद्रिय, गांडूळ, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात ‘मृद आरोग्य पत्रिका अभियान" राबविण्यात येत आहे.योजनेत सहभागी शेतकऱ्यांची वर्गवारी अभियानातून माती नमुन्याची आवश्यक तपासणी करता यावी, यासाठी कृषी विभागाने एक हेक्टरपर्यंतचे सिमांतक शेतकरी, दोन हेक्टरपर्यंतचे लहान शेतकरी, पाच हेक्टरपर्यंतचे अर्धमध्यम शेतकरी, दहा हेक्टरपर्यंतचे मध्यम व दहा हेक्टरपेक्षा जास्ती क्षेत्र असलेले मोठे शेतकरी, अशी वर्गवारी केली आहे. मृद आरोग्य अभियानातून दर तीन वर्षांतून एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण होणार आहे.अशी करणार नमुने तपासणीबागायती क्षेत्रात वर्गवारी केलेल्यानुसार सिमांतक व लहान शेतकऱ्यांच्या २.५० हेक्टर क्षेत्रामधून एक नमुना, अर्धमध्यम व मध्यम शेतकऱ्यांच्या क्षेत्र परिघातून एक नमुना, तर जिरायती भागात सिमांतक, लहान, अर्ध, मध्यम शेतकऱ्यांच्या १० हेक्टर क्षेत्राच्या परिघात एक; तर मोठ्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील परिघात एक नमुना तपासणीसाठी घेतला जाणार आहे.