शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:50 IST

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : चातुर्मासानिमित्त राज्यातील ५२९ गावांमध्ये श्वासानंद नामजप अभियान राविण्यात आले. ‘ॐ ब्रह्मी श्वासानंदाय नम:’ असा हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये जन्मलेले एकोणिसाव्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांना इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या गुरुगादीवरील चौथे उत्तराधिकारी अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ५२९ लहानमोठ्या गावांमध्ये ‘श्वासानंद नामजप अभियान’ राबविण्यात आले. एकाचवेळी एवढ्या गावांमध्ये सारख्याच पद्धतीने शिस्तबद्धरित्या राबविल्या गेलेल्या या उपक्रमाची आध्यात्मिक प्रांतात विशेष दखल घेतल्या जात आहे.संत बाळाभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग राज्यात आणि देशातच नव्हे तर विदेशातही विखुरलेला आहे. गुरुभक्तांच्या या विशाल संप्रदायाचे संवाहक विद्यमान पीठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी महाराजांच्या महामंत्राचा सामुहिक नामजप करण्याची प्रेरणा दिली. आणि राज्यस्तरीय नामजप अभियान समिती गठित होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चातुर्मासातील चार महिन्यांचा पवित्र कालावधी या अभियानासाठी निवडण्यात आला. या उपक्रमाच्या विशेष नोंदपुस्तिका तयार करण्यात येऊन त्या राज्यस्तरीय समितीचे संयोजक सुरेश बोचरे (औरंगाबाद), सहसंयोजक श्रीरंग सावजी (मेहकर), श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने महाराष्ट्रात सर्वत्र पोचविल्या. या उपक्रमाला गुरुभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अभियानाची सांगता चातुर्मास समाप्तीनंतर मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये गायत्री परिवाराच्या पौरोहित्याखाली विधिवत होम-हवन करून या अभियानाची सांगता करण्यात आली. कार्तीक पोर्णिमेला या अभियानाची सांगता झाली. मुंबईपासुन ते चंद्रपूरपर्यंत एकूण ५२९ गावांमध्ये ठरविलेल्या पद्धतीनुसार शिस्तबद्धरीतीने हे अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक