शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

'दुकान सुरूच आहे...तुम्ही फक्त शटर वाजवा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:49 AM

Lokcdown in Chikhli : अनेक व्यावसायिकांनी आदेश झुगारून आपली दुकाने आतून चालूच ठेवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत सोमवार ते शुक्रवार जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाचा हा आदेश पाळत शहरातील काही व्यावसायिकांनी गत पाच दिवस नियमांचे पालन केले; मात्र अनेक व्यावसायिकांनी 'दुकान सुरूच आहे... तुम्ही फक्त शटर वाजवा; आम्ही आतच आहोत'चा पवित्रा घेतल्याने शहरात लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला होता.काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता वीक एण्ड लॉकडाऊनचा पहिला दिवस शहरात कडकडीत पाळला गेला.चिखली शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. सर्वच दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेले असून अनेक रुग्णांना ऐनवेळी बेड उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. एकूण अशी बिकट अवस्था असताना जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या निर्बंधांना गत पाच दिवस पावलोपावली बगल दिली गेली. काही व्यावसायिक नियमांचे पालन करीत निर्बंध लागू झाल्यापासून त्यांचे पालन करीत आहेत; मात्र 'बंदीत चांदी' करून घेण्याच्या हव्यासाने अनेक व्यावसायिकांनी आदेश झुगारून आपली दुकाने आतून चालूच ठेवली होती. परिणामी शहरात सर्वत्र दुकाने बंद दिसत असली तरी प्रत्यक्षात ती छुप्या पद्धतीने सुरूच होती. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचाही पुरता फज्जा उडताना दिसला. याखेरीज जीवनावश्यक सेवेतील दुकानांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळले गेले नाहीत. प्रत्येक दुकानात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. गत पाच दिवसांत शहरातील हे चित्र पाहता वीक एण्ड लॉकडाऊनकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र वीक एण्ड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने प्रतिसाद दिला असून काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता इतर सर्वच दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. रस्त्यावरही तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. 

टॅग्स :ChikhliचिखलीMarketबाजार