महेश नवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा

By Admin | Updated: June 7, 2014 23:44 IST2014-06-07T23:23:20+5:302014-06-07T23:44:37+5:30

माहेश्‍वरी समाजाचे आराध्य दैवत श्री महेश नवमीनिमित्त आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Shobha Yatra from Mahesh Navami for the city | महेश नवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा

महेश नवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा

खामगाव: माहेश्‍वरी समाजाचे आराध्य दैवत श्री महेश नवमीनिमित्त आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माहेश्‍वरी समाजातील प्रत्येकाने या शोभायात्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माहेश्‍वरी मंडळ, माहेश्‍वरी महिला मंडळ, माहेश्‍वरी नवयुवती मंडळ, माहेश्‍वरी युवक मंडळ, महेश सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी उंटावर बसलेले दोन युवक सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. त्यानंतर शुभ्र वस्त्रधारण केलेले महेश सेवा समितीचे पदाधिकारी, पालखी आणि त्यानंतर आकर्षक वस्त्र परिधान केलेल्या महिला आणि युवती या शोभायात्रेत सहभागी होत्या. सर्वात शेवटी भगवान महेशाचा आकर्षक चित्ररथ सर्वांंचे लक्ष खेचून घेत होता. खामगाव शहरातील माहेश्‍वरी भवनातून याशोभायात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर शिवाजी वेस, फरशी, प्रेम रेसीडेंसी, अग्रेसन चौक, भुसावल चौक, मुख्य रस्ता, महावीर चौक, जगदंबा रोड, सराफा मार्गे माहेश्‍वरी भवनात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Shobha Yatra from Mahesh Navami for the city