शिवराणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात

By Admin | Updated: March 9, 2015 02:04 IST2015-03-09T02:04:03+5:302015-03-09T02:04:03+5:30

चिखली शहरातून निघाली भव्य मिरवणूक.

Shivrajanitra on behalf of Shivrana Mitra Mandal | शिवराणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात

शिवराणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात

चिखली (जि. बुलडाणा): छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती शहरात शिवराणा मित्रमंडळाच्याव तीने मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.
शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने स्थानिक शिवराणा अर्बन सोसायटीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशाच्या निनाद, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढल्यानं तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंंत पोहचल्यानंतर या ठिकाणी मित्रमंडळाचे संस्थापक तथा माजी जि.प. अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास २१ लीटर दूध, दही व मंत्रोच्चारात अभिषेक केल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी शिवराणा मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष ङ्म्रीकिसन धोंडगे, सुधाकर काळे, विलास सुरडकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, कुणाल बोंद्रे, गुलाबराव मोरे, परसराम जोशी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shivrajanitra on behalf of Shivrana Mitra Mandal