शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रकल्पाची दुरवस्था

By admin | Updated: June 15, 2014 00:44 IST

सरोवर काठावर उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे दुरावस्था झाली आहे.

लोणार : शहरातील सांडपाणी थांबविण्यासाठी सरोवर काठावर उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम चांगले होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्प हस्तांतरण करुन घेण्यास नगर पालीकेने असर्मथता दर्शविली आहे.

संपूर्ण जगातील संशोधकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणार्‍या येथील वैशिष्टपूर्ण खार्‍या पाण्याच्या सरोवरात जाणारे शहरातील सांडपाणी अडकविण्यासाठी नगर पालीकेच्या वतीने १५ वर्षापूर्वी ३६ लक्ष रुपये खर्च करुन नबीच्या खड्डयाजवळ दगडी भिंत बांधली. मात्र या भिंतीचा काहीही उपयोग झाला नाही. दगडी भिंत बांधल्यानंतरही शहरातील घाण सांडपाण्यासह सरोवरात जाऊ लागली. त्यामुळे सरोवराच्या खार्‍या पाण्यात असलेल्या अतिशय दुर्मिळ जैवविविधता जिवाणू यांचे अस्तीत्व धोक्यात आले. खार्‍या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्यात होऊ लागले. विविध विषयावरील संशोधनासाठी महत्वपूर्ण असलेले विवरातील खार्‍या पाण्याचे वैशिष्ट यामुळे नष्ट होत चालल्याची भिती जगभरातील संशोधकांनी व्यक्त केल्यानंतर राज्यातील काही विज्ञान प्रेमिंनी निसर्गाचा अद्भूत ठेवा असलेल्या लोणार सरोवराच्या जतन आणि खंडपिठात जनहित याचीका दाखल करुन यासाठी न्यायालयास हस्तक्षेप करण्याची विनंती केली. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी विकास आराखडा तयार केला. त्यानुसार सरोवरात जाणारे शहरातील घाण पाणी रोखण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजुर केला. यासाठी शासनाने निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी संशोधन संस्था नागपूर) यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करुन प्रकल्पाचे काम सुरु केल्यापासून वर्षभरात पुर्ण करायचे होते. मात्र तीन वर्ष होऊनही काम अजुनही अपूर्ण थंबस्त्यात आहे. शहरातून वाहणार्‍या सांडपाण्याच्या क्षमतेच्या तुलनेत कमी क्षमता असलेला प्रकल्प बांधून संबंधित ठेकेदाराने शासनाची दिशाभुल केली आहे. सदर प्रकल्पाचे बांधकाम करतांना निरिने तसेच ठेकेदाराने भविष्यात शहराच्या वाढणार्‍या लोकसंखेच्या तुलनेत वापरात येणारे पाणी आणि पावसाळ्यात शहरातील नाल्यांमधून वाहणारे पाणी याचा कोणताही विचार न करता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लोणारकरांच्या आणि शासनाच्या माथी मारला आहे.