शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवारीकडे सेनेचे लक्ष

By admin | Updated: August 18, 2014 23:44 IST

गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेतच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

बुलडाणा: जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेतच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सेनेतील या कुरघोडी थांबविण्यासाठी पक्षपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. तर काँग्रेसमध्ये उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या असून, तिकिटासाठी जंगी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. मुळातच येथील लढाई ही काँग्रेस विरुद्ध सेना अशीच होणार असल्याने शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण, याकडे सेनेचे लक्ष लागून आहे. बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेत आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात सुरू असलेल्या लहान-मोठय़ा करबुरीं ठळकपणे समोर आल्या असून, यामुळे त्यांची उमेदवारी कापली जाईल ही शक्यता अजिबात नाही. मात्र या निमित्ताने सेनेतील त्यांचे विरोधक समोर आले आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी उतावीळ झालेल्या सेनेने यापूर्वीच सर्व विद्यमान आमदारांना निवडणुकीसाठी मोकळे सोडले आहे त्यामुळे शिंदे आधीच कामाला लागले आहेत. मुळातच आ. शिंदे यांचा असलेला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा ह्यडॅमेजह्ण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असले तरी आ. शिंदे यांनी विरोधकांवर मात करीत मातोङ्म्रीचा आशीर्वाद कायम ठेवला आहे. जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात तडकाफडकी झालेला बदल ही त्याची चुणूक होती व आता उघडपणे बंड पुकारणारे शहरप्रमुखही पदावरून हटविल्या गेले. त्यामुळे मोदी नावाचा अँडव्हान्टेज घेत यावेळी आ. शिंदे यांची जनता गाडी 'लाल' दिव्यापर्यंत पोहचेल या दृष्टीने सेनेने काम सुरू केले आहे. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या विजयामध्ये काँग्रेसमधील असंतुष्टांकडून आतून मिळणार्‍या रसदीचा वाटा मोठा राहिला आहे. त्यामुळेच कोण कधी कामात येईल, या हेतूने संपूर्ण आमदारकीच्या काळात आ. शिंदे यांनी कुण्याही काँग्रेस नेत्याला टीकेचे लक्ष्य न करता आपले काम करण्यातच धन्यता मानली. हाच प्रकार काँग्रेसच्या गोटात आहे. कोणत्याही काँग्रेस नेत्याने गेल्या पाच वर्षात आ. शिंदे यांना उघड आव्हान दिले नाही त्यामुळे जोपर्यंत उमेदवार ठरत नाही, तोपर्यंत बुलडाण्याची लढाई स्पष्ट होत नाही.लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या झालेल्या देशपातळीवरील पराभवाने सारेच सुन्न आहेत. तिकिटासाठी काँग्रेसमध्येही मोठी स्पर्धा असली तरी लोकसभेतील पराभावामुळे प्रत्येक इच्छुक ह्यरिस्कह्ण घेण्यापूर्वीची चाचपणी करत आहे. सेनेतील वातावरण, कुठल्याही विद्यमान आमदारांप्रती प्रत्येक वेळी राहत असलेली एन्टीइन्कम्बन्सी ही सध्या काँग्रेसच्या बेरजेची गणिते आहेत. मोदी लाटेतही काँग्रेस-राकाँच्या उमेदवाराला मिळालेली ४३ हजार मते या शिदोरीवर काँग्रेसमधील इच्छुकांची भिस्त आहे.हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जयङ्म्री शेळके व धृपदराव सावळे यांनी सामाजिक व राजकीय गणिते मांडून आपला सारीपाट तयार केला आहे, तर दुसरीकडे एकनाथ खर्चे, मुख्यारसिंग राजपूत ज्येष्ठतेचा दावा करीत असून, डॉ. मधुसूदन सावळे, विश्‍वनाथ माळी यांनाही ह्यलॉटरीह्ण ची आशा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील प्रत्येक इच्छुक कामाला लागला असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधील ही नेत्यांची दमदार फळी प्रत्यक्षात दहा दिशांनी धावणारी आहे. कुण्या एकालाही तिकीट मिळाले की बाकी सारे एकत्र होत काँग्रेसच्याच उमेदवाराला ह्यहातह्ण दाखवितात. यावेळी मात्र असे होऊ नये म्हणून सामूहिक नेतृत्वाची नवी टूम जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी आणली असून, तिकीट जाहीर होईपर्यंत सर्व इच्छुकांनी एकत्रित प्रचार करावा असा त्यांचा प्रयत्न आहे मात्र इच्छुकांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अशा प्रयोगाच्या नादी लागणार नाही, हे स्पष्टच आहे.जागा वाटप बुलडाणा काँग्रेसकडे असले तरी राष्ट्रवादीलाही आमदारकीचे घुमारे फुटले आहेत. अजितदादांच्या उपस्थितीत शनिवार झालेल्या निर्धार मेळाव्यात या मागणीची ह्यधारह्ण अधिक तीव्र करून काँग्रेसवर राष्ट्रवादीने दबाव वाढविला आहे.या दोन्ही पक्षांनी लोकसभेतील पराभवापासून धडा घेतला असेल तरच सेनेसोबत होणारा हा सामना अधिक चुरशीचा होईल अन्यथा विधानसभेची कथा मागील पानावरून पुढे सरकेल इतकेच. अशी सध्या तरी चर्चा आहे. खरे चित्र काँग्रेसचा उमेदवार कोण, यावरच अवलंबून आहे.