दुसरबीडनजीक सहा तास वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: September 4, 2015 23:59 IST2015-09-04T23:59:50+5:302015-09-04T23:59:50+5:30

दुसरबीडपासून तीन किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

In the second, six hours traffic disruption | दुसरबीडनजीक सहा तास वाहतूक विस्कळीत

दुसरबीडनजीक सहा तास वाहतूक विस्कळीत

दुसरबीड (जि. बुलडाणा) : मेहकर-सिंदखेडराजा महामार्गावर दुसरबीडनजीक ४ सप्टेंबर रोजी सकाळी एका जड वाहनाला अपघात झाल्यानंतर ते बंद पडल्याने जवळपास सहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. चंद्रपूरहून सिमेंट घेऊन जालन्याला निघालेल्या एम.एच.३४ ए.बी. १२२१ क्रमांकाच्या व्हॉल्व्हो या वाहनाचा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावर दुसरबीडपासून तीन किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मानव विकासच्या एसटी बसही अडकल्याने विद्यार्थ्यांंना शाळेत जाण्यासाठी उशिर झाला होता. (वार्ताहर)दुसरबीडनजीक सहा तास वाहतूक विस्कळीत दुसरबीड : मेहकर-सिंदखेडराजा महामार्गावर दुसरबीडनजीक ४ सप्टेंबर रोजी सकाळी एका जड वाहनाला अपघात झाल्यानंतर ते बंद पडल्याने जवळपास सहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. चंद्रपूरहून सिमेंट घेऊन जालन्याला निघालेल्या एम.एच.३४ ए.बी. १२२१ क्रमांकाच्या व्हॉल्व्हो या वाहनाचा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावर दुसरबीडपासून तीन किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मानव विकासच्या एसटी बसही अडकल्याने विद्यार्थ्यांंना शाळेत जाण्यासाठी उशिर झाला होता.

Web Title: In the second, six hours traffic disruption