चंदनाचे झाड लंपास

By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-07T00:00:33+5:302014-06-07T00:18:11+5:30

लोणार येथील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरले; चोरट्यांना तासाभरात अटक

Sandalwood lump | चंदनाचे झाड लंपास

चंदनाचे झाड लंपास

लोणार : येथील लोणी रोडवरील कासम ठेकिया यांच्या घराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या २५ हजार रु पये किमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ६ जूनच्या रात्री घडली.   ठेकिया यांनी तात्काळ पोस्टेला सदर चोरीची फिर्याद नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अ प १0४/१४ कलम ३७९ भादंवि भारतीय वन अधिनियम कलम २६ फ नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीसुद्धा सदर चोरट्यांनी अनेक ठिकाणची चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
**चोरटे शाहरुख-सलमानला तासाभरात अटक
कासम ठेकिया यांच्या घरातील २५ हजार रु. किमतीचे चंदनाचे झाड चोरुन पळ काढण्यात यशस्वी झालेले जालना जिल्ह्यातील कवठा बाजार येथील शाहरुख खान कदीर खान पठाण आणि सलमान खान अजीस खान पठाण (वय २0 वर्षे) यांच्या मागावर असलेल्या पो.कॉ. कुसुंबे, संजय जाधव, अरुण सानप, सरकटे आणि शिंदे यांनी शहरापासून काही अंतरावरच दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले.

Web Title: Sandalwood lump