संभाजी महाराज जयंती शोभायात्रा

By Admin | Updated: May 15, 2014 00:28 IST2014-05-15T00:28:06+5:302014-05-15T00:28:40+5:30

छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुलडाणा शहरात धर्मविर आखाड्याच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Sambhaji Maharaj Jayanti Shobayatra | संभाजी महाराज जयंती शोभायात्रा

संभाजी महाराज जयंती शोभायात्रा

बुलडाणा : छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुलडाणा शहरात धर्मविर आखाड्याच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी धर्मवीर आखाड्याचे प्रमुख संजय गायकवाड, धर्मवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवे फेटे, भगवे झेंडे, तसेच घोड्यावर संभाजी राजे अशा थाटात ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने जावून ठिकठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. तर संगम चौक व जयस्तंभ चौक येथे महाराजांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी संगम चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एका सुशोभीत केलेल्या वाहनावर संभाजी राजे यांची भव्यदिव्या प्रतिमा उभारण्यात आली होती. वाहनाच्या समोर ढोल ताशाच्या नादावर तलवारबाजी, दांडपट्टा खेळणारे बालक बालीका तर फेटे परिधान करून मराठमोळया थाटात धर्मवीर आखाड्याचे कार्यकर्ते अशी ही शोभायात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

Web Title: Sambhaji Maharaj Jayanti Shobayatra