सागवानचे चार ट्रक पकडले

By Admin | Updated: June 16, 2014 00:50 IST2014-06-15T23:40:48+5:302014-06-16T00:50:11+5:30

सागवान लाकडांनी भरलेले ४ ट्रक तामगाव पोलिसांनी पकडले

Saguwan's four trucks were seized | सागवानचे चार ट्रक पकडले

सागवानचे चार ट्रक पकडले

संग्रामपूर : सागवान लाकडांनी भरलेले ४ ट्रक तामगाव पोलिसांनी शनिवारी दुपारी पकडले होते. चौकशीअंती हि लाकडे एका शेतकर्‍याच्या शेतातील असल्याचे निष्पन्न झाले. सदर सागवान लाकूड व्यापार्‍याने विकत घेतल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्याने चारही ट्रक सोडून देण्यात आले. तेल्हारा- संग्रामपूर रस्त्याच्या सिमेवर हे ४ ट्रक उभे असल्याची माहिती सुत्रांनी दिल्यानंतर पोलिसांनी चारही ट्रक ताब्यात घेतले. दरम्यान, वाहतूक परवाना आणल्यानंतर ट्रक सोडण्यात आल्याची माहिती ठाणेदार ताठे यांनी दिली. सदर सागवानाची लाकडे वाडी अदमपूर येथील कमलाबाई आमदान मंत्री या शेतकर्‍याच्या शेतातील असल्याने सोडून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तशी नोंद स्टेशन डायरीमध्ये घेण्यात आली आहे.

Web Title: Saguwan's four trucks were seized