शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालय शस्त्रक्रियेसाठी सज्ज

By admin | Updated: May 16, 2014 00:05 IST

मेहकर ग्रामीण रुग्णालयात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीवर अँपेन्डिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने या रुग्णालयात पोटाच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेहकर : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीवर अँपेन्डिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने या रुग्णालयात पोटाच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. शासकीय आरोग्य तपासणी मोहिमेंतर्गत तालुक्यातील जानेफळ येथील सरस्वती विद्यालयातील नववीची विद्यार्थिनी अंजली गजानन सपकाळ हिस अँपेन्डिक्सचा त्रास असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले होते. मेहकर ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत ही शस्त्रक्रिया होत नव्हती. मात्र येथील डॉ. मुंदडा यांना आरोग्य विभागाने मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले व डॉ. मुंदडा, भूलतज्ज्ञ डॉ. उमेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित यांनी अंजलीवर ८ मे रोजी अँपेन्डिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे मेहकर ग्रामीण रुग्णालयात आता शासकीय खर्चात पोटाच्या शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. लखोटिया सिझरकरिता, डॉ. अनिल गाभणे (हृदयरोगतज्ज्ञ व सर्व आजार) हेसुद्धा मानद अधिकारी म्हणून सेवा देतात. डोळ्याच्या शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित करतात. रुग्णांनी या सर्व सोयींचा फायदा घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले असून, या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित मिळावा, जनतेची मागणी आहे.