खामगाव, दि. १९- खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा २२ क्विंटल तांदूळ तसेच या मालाची वाहतूक करणारी जीप पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई नांदुरा पोलिसांनी करुन याप्रकरणी शनिवारी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजू खर्डे यांना मालवाहू जीप क्र. एमएच ४२-बी ५९0६ मधून राशनचा तांदूळ खुल्या बाजारात जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर वाहन थांबवून पाहणी केली असता, सदर वाहनात राशनचा तांदूळ आढळून आला. त्यामुळे त्यांनी वाहन व तांदूळ ताब्यात घेतला होता. ही घटना १५ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी या क्रमांकाच्या जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}