शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांना महसूल कर्मचा-यांचे अभय

By admin | Updated: January 2, 2015 00:43 IST

हप्तेखोरीमुळे वाढली रेतीची चोरी : बाळापुरातील अधिका-यांची शेगाव शहरात वसुली.

फहीम देशमुख / शेगावशेगाव आणि बाळापूर येथील तहसीलदारांनी रेती चोरट्यांविरोधात रात्री-बेरात्री करवाई सुरू केली असताना याच अधिकार्‍यांचे कर्मचारी खुलेआम रेती चोरी करणार्‍या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची वसुली करीत असल्याची बाब लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली आहे.वेळ सकाळी साडेपाचची.. शेगाव शहराबाहेर बाळापूर येथील रेती चोरी करणार्‍यांविरुद्ध कारवाई करणारे पथक रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवित असल्याची माहिती मिळताच.. लोकमतची चमू वाहनमालक बनून घटनास्थळी पोहोचतात.. आणि मग सुरु होते देवाण- घेवाणीची प्रक्रिया.. यामध्ये चमूने बोलणी सुरु केल्यानंतर तीन गाड्यांचे प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे मागणी केली आणि पैसे नसतील तर पो.स्टे. ला गाड्या लावतो, अश्या धमक्या दिल्या. चमूने आधी १0 हजारमध्ये निपटून घ्या, अशी विनवणी केली; मात्र दोन्ही अधिकार्‍यांवर कुठलाही फरक न पडल्याने १५ हजारा प्रमाणे तिन्ही गाड्यांचे पैसे त्यांना देण्यात आले. ही हद्द तर शेगावची आहे, असे म्हटल्यानंतर सदर अधिकार्‍यांना थोडी शंका आली; मात्र हद्द कोणतीही असो, पैसे द्यायचे असेल तर सांगा, नाही तर गाड्या अकोला जिल्ह्यात घेऊन चला, असे सुनावले. उल्लेखनीय म्हणजे सदर व्यवहारासाठी त्यांनी एका खासगी वाहनाचा उपयोग केला गेला. या सर्व प्रकारात रेती चोरी करणार्‍या वाहनांना हप्ते दिल्यानंतर सर्रास सोडून दिल्या जात असल्याचे आणि पैशांसाठी जिल्ह्याची हद्द सोडून इतर ठिकाणीही वसुली केल्या जात असल्याचे उघडकीस आले.