शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मत्सव्यवसायाच्या माध्यमातून २ कोटीचा महसुल

By admin | Updated: December 26, 2014 00:00 IST

बुलडाणा जिल्ह्यातून शासनाच्या तजोरीत २ कोटी ५२ लाख रूपयाचा महसूल जमा.

बुलडाणा: मागील सहा वर्षात मत्सव्यवसायाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातून शासनाच्या तजोरीत २ कोटी ५२ लाख रूपयाचा महसूल जमा झाला. यामध्ये जिल्ह्यातील तलावाचा ठेका, मत्सबीज विक्री आणि इतर संकीर्ण वसूलीचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करणार्‍या १७0 संस्था नोंदणीकृत आहेत. यापैकी काही संस्था बंद पडल्या असून जेमतेम संस्था सुरू आहेत. अनेक संस्था तर नाममात्र कागदावर कार्यरत आहे. जिल्ह्यात ४८३ तलाव आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे १0२, जिल्हा परिषदेचे ३३१, ग्रमापंचायतीचे ४७ आणि नगर परिषदेच्या ३ तलावाचा समावेश आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरूवात झाली असली तरी सुरूवातीच्याच पावसाने बहुतेक तलाव शंभरटक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी सुध्दा मत्सव्यवसाय बर्‍यापैकी आहे. मागील २00९-२0१0 ते २0१४-१५ या सहा वर्षात २ कोटी ५२ लाख ७२ हजार ८७५ रुपयाचा महसुल शासनाला मिळाला. यामध्ये जिल्ह्यात असलेले तलावाच्या ठेक्याच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख ५६ हजार रुपये तर मत्सबीज विक्रीपासून ३३ लाख १६ हजार १९७ रुपये आणि इतर संकीर्ण वसुलीचे ९९ हजार ९६४ रुपयाचा महसुल जमा झाला आहे. यापूर्वी मत्स्य व्यवसाय संस्थाना तलावात बीज सोडण्यासाठी शासनाकडून ३३ टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, हे अनुदान बंद करण्यात आल्याने संस्था डबघाईस आल्या आहेत. संस्थांना स्वत:कडील आर्थिक भांडवल लावून बीज खरेदी करावी लागत असल्याने चांगलीच दमछाक होत आहे.